इतर समाजाच्या घुसखोरीविरोधात ठोस भूमिका घ्या!



आदिवासीं लढ्या बाबत डॉ. दाभाडे यांची स्पष्ट भूमिका


पुणे : राज्यात गेल्या महिनाभरात तालुका ते जिल्हा पातळीपर्यंत आदिवासी समाजाचे महामोर्चे मोठ्या संख्येने निघत आहेत. धनगर आणि बंजारा समाजाच्या घुसखोरीविरोधात तसेच इतर प्रलंबित मागण्यांसाठी हे मोर्चे आयोजित करण्यात आले आहेत.

या चळवळीमागे शेकडो आदिवासी कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे अपार परिश्रम आहेत.


आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे मुख्यमंत्र्यांना सोबत थेट संवाद साधणे, अशी मागणी पुणे येथील डॉ. संजय दाभाडे यांनी केली आहे. आदिवासी नेत्यांकडून पण हीच मागणी पुढे आली आहे.



डॉक्टर दाभाडे यांनी म्हटले आहे की, राज्यभर आदिवासींचे महामोर्चे; धनगर-बंजारा घुसखोरी, आश्रमशाळा भरती आणि पेसा पदभरतीसह मागण्यांवर ठोस भूमिका आवश्यक आहे. 


या लढ्याच्या माध्यमातून पुढे आलेल्या मुख्य मागण्या धनगर व बंजारा समाजाच्या घुसखोरीविरोधात ठोस भूमिका घ्यावी, आश्रमशाळांमधील बाह्यस्रोत भरती प्रक्रिया थांबवावी, बिंदू नामावलीतील अन्याय तातडीने दुरुस्त करावा, पेसा भरती आणि पदभरती तातडीने करण्यात याव, आदिवासी सल्लागार परिषदेची बैठक तातडीने बोलवावी या सर्व मागण्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि संबंधित मंत्र्यांपर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज आहे.


या संदर्भात आदिवासी नेते आणि कार्यकर्त्यांनी मंत्री अशोक उईके यांच्याशी संपर्क साधून मुख्यमंत्री महोदयांसोबत मोर्चांच्या संयोजकांची बैठक आयोजित करण्याची मागणी केली जात आहे. प्रत्येक जिल्हा आणि तालुका पातळीवरील कार्यकर्त्यांनी आपल्या भागातील आमदार व मंत्र्यांच्या माध्यमातून पाठपुरावा करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.


डॉ. संजय दाभाडे यांनी या चळवळीच्या दिशेचा उल्लेख करताना म्हटले आहे कीआदिवासी जनता एवढ्या ताकदीने रस्त्यावर उतरली आहे, त्याचा परिणाम प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेत दिसला पाहिजे. मुख्यमंत्र्यांसमोर आपली भूमिका स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे.”


राज्यभर आदिवासी जनतेचा आवाज बुलंद झाला असूनया चळवळीचा परिणाम शासनाच्या धोरणनिर्मितीत दिसावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


 clear stance on tribal struggle



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने