Stock market : तीन दिवसात सेन्सेक्सवर 1900 अंकांची झेप!



Stock market rebounds before Diwali, relief for investors : दिवाळीपूर्वी शेअर बाजारात तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा

मुंबई : दिवाळीपूर्वी भारतीय शेअर बाजारात प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या तीन दिवसांत सेन्सेक्सने तब्बल 1900 अंकांची झेप घेतली, तर निफ्टी 50 ने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. बाजारातील या जबरदस्त तेजीमुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला असून, दिवाळीपूर्वीच नफ्याची फुलबाजू फुलल्याचं चित्र आहे.

सेन्सेक्स 83952 अंकांवर तर निफ्टी 25710 अंकांवर बंद झाला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेली ही तेजी गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा घेऊन आली आहे. ऑक्टोबर महिन्यात शेअर बाजारात सर्वाधिक तेजी पाहायला मिळाली आहे. सेन्सेक्समध्ये 4.6 टक्क्यांची वाढ झाली असून, बँकिंग शेअर्समध्ये विशेष उछाल आहे. विदेशी गुंतवणूकदारांनी केलेली नवी गुंतवणूक आणि अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीच्या आशेने बाजारात सकारात्मक संकेत मिळाले आहेत.

देशांतर्गत संस्थात्मक गुंतवणूकदारांनी गेल्या आठवड्यात 16247 कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले. तर, विदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे 556 कोटी रुपयांची खरेदी केली आहे. या वाढीमुळे बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढत आहे.

एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचा आयपीओ देखील गुंतवणूकदारांसाठी सोन्याची संधी ठरला. कंपनीचा शेअर 50% प्रीमियमसह 1710.1 रुपयांवर लिस्ट झाला. ज्यांना हा आयपीओ मिळाला, ते गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

याशिवाय रिअल्टी आणि हेल्थकेअर क्षेत्रातही तेजी दिसून आली आहे. भारत आणि अमेरिकेनं नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात व्यापार करार पूर्ण करण्यावर सहमती दर्शवली आहे, ज्याचा सकारात्मक परिणाम भारतीय बाजारावर झाला आहे.

( शेअर बाजार आणि म्युच्युअल फंड हे जोखमीच्या अधीन असतात. या बातमीत दिलेली माहिती केवळ मार्गदर्शनात्मक आहे; गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्यावा.)

#Share Market News, #Sensex Today, #Nifty,  50 High, #Stock Market Rally , #Diwali 2025 Market Update, #LG Electronics IPO Listing, #Foreign Institutional Investors, #Domestic Investors, #Banking Stocks Boom, #Realty and Healthcare Stocks




Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने