समाजोन्नतीसाठी धम्म, ज्ञान समतेच्या मार्गाची गरज


आ. जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात कार्यक्रम

चंद्रपूर : धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त आमदार किशोर जोरगेवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात भारतरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी विचारांना उजाळा देत, त्यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन समाजात समानता, बंधुता आणि करुणे\चा संदेश दिला.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, विधानसभा अध्यक्ष वंदना हातगावकर, महामंत्री श्याम कनकम, सविता दंढारे, माजी नगर सेविका पुष्पा उराडे, विमल कातकर अमोल शेंडे, सायली येरणे, मुग्धा खाडे, नकुल वासमवार, दुर्गा वैरागडे, कल्पना शिंदे, शालिनी राऊत, माला पेंदाम, यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचीमोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिन हा केवळ ऐतिहासिक दिवस नाही, तर मानवतेचा नवा अध्याय सुरू करणारा दिवस आहे. बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार करून जगाला समानता, बंधुता आणि करुणेचा मार्ग दाखविला. आजच्या काळात त्यांच्या या विचारांची गरज अधिक तीव्रतेने भासते. समाजात भेदभाव, असमानता आणि द्वेष नाहीसा होण्यासाठी आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांनुसार आचरण करण्याची गरज आहे. नागपूर नंतर चंद्रपुच्या दीक्षा भूमी येथे त्यांनी दीक्षा दिली. त्यामुळे या पवित्र स्थळाचा विकास करण्यासाठी आपण पहिल्या टप्प्यात ५७ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यातून येथे सर्व सोयी सुविधा उपलब्ध केल्या जाणार आहे.

  बाबासाहेबांनी दिलेली बौद्ध विचारधारा ही केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे. आपण या धम्ममार्गावर चालून समाजात शांती, प्रेम आणि समतेचा दीप प्रज्वलित ठेवला पाहिजे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाला दिशा दाखवत असल्याचे ते यावेळी म्हणाले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.







Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने