आयपीएस पूरन कुमार प्रकरणाने हादरलेले प्रशासन

 


गेल्या 10 वर्षांत आयपीएस सुसाईडचा तिसरा प्रकार


नवी दिल्ली : हरियाणातील 2013 बॅचचे IPS अधिकारी पूरन कुमार यांच्या आत्महत्येने पोलिस प्रशासनात खळबळ माजली आहे. 7 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी आत्महत्या केली असून या प्रकरणाची चौकशी सध्या सुरू आहे. पूरन कुमार यांनी मागे ठेवलेल्या सुसाइड नोटमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेल्या मानसिक छळाचा उल्लेख केला आहे.


सुसाइड नोटमध्ये त्यांनी नमूद केले आहे की, काही अधिकाऱ्यांनी त्यांच्या सुट्ट्या नाकारल्या, वडिलांना भेटण्याची संधी दिली नाही आणि त्यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल केल्या. इतकंच नव्हे, तर नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांच्याकडून अधिकृत सरकारी वाहनही काढून घेतल्याचं त्यांनी लिहिलं आहे. “आता हा छळ सहन होत नाही, म्हणून मी सगळं संपवण्याचा निर्णय घेतलाय,” असे भावनिक शब्द त्यांनी आपल्या सुसाइड नोटमध्ये लिहिले आहेत.


पूरन कुमार यांचं हे आत्महत्येचं पाऊल प्रशासनासाठी धक्कादायक ठरलं आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं असून चौकशीची मागणी सुरू आहे. हरियाणा सरकारने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.


मात्र, पूरन कुमार हे आत्महत्या करणारे पहिलेच आयपीएस अधिकारी नाहीत. गेल्या 10 वर्षांत देशातील ही तिसरी अशी घटना आहे ज्यात आयपीएस अधिकाऱ्याने आत्महत्या केली आहे.


2015 ते 2025 या 10 वर्षांतील IPS आत्महत्यां प्रकरणांनी अशीच खळबळ माजवून दिली होती. यात

 के. शशी कुमार (K. Sashi Kumar) – 2012 बॅच IPS अधिकारी, आंध्र प्रदेशातील पाडेरू येथे SP पदावर कार्यरत असताना जून 2016 मध्ये सर्व्हिस रिव्हॉल्वरने आत्महत्या केली. तेव्हा त्यांचे वय फक्त 29 वर्षे होते.



हिमांशू रॉय (Himanshu Roy) – 1988 बॅच महाराष्ट्र कॅडरचे अधिकारी. मुंबई पोलिसांत जॉईंट कमिशनर (क्राईम) आणि नंतर ATS प्रमुख म्हणून कार्यरत. कॅन्सरच्या दीर्घ आजारानंतर 11 मे 2018 रोजी आत्महत्या केली होती.


 पूरन कुमार (Puran Kumar) – हरियाणातील 2013 बॅच IPS अधिकारी. 7 ऑक्टोबर 2025 रोजी त्यांनी वरिष्ठांच्या जासाला कंटाळून आत्महत्या केली या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असून हे प्रकरण चांगले चर्चेत आहे.


या घटनांनी पोलिस यंत्रणेत वाढत्या मानसिक तणावाचा प्रश्न पुढे आणला आहे. वरिष्ठांकडून होणारा दबाव, शिस्तपालनातील कठोर नियम आणि वैयक्तिक जीवनातील ताण यामुळे अनेक अधिकारी मानसिकदृष्ट्या कोसळत असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.


 प्रशासनात या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात असून अधिकारीवर्गासाठी मानसिक आरोग्य सल्लामसलत आणि सहाय्य यंत्रणा अधिक मजबूत करण्याची मागणी होत आहे.


____

IPS Puran Kumar suicide case; Three incidents in 10 years


___


Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने