Breaking

Post Top Ad

शनिवार, २० नोव्हेंबर, २०२१

अखेर खासदाराला आर्णीत येण्याचा मुहूर्त मिळाला

अखेर खासदाराला आर्णीत येण्याचा मुहूर्त मिळाला
महाराष्ट्र24यवतमाळ : काॅग्रेसचे एकमेव खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर हे निवडून आल्यानंतर एक ते दोन वेळा आर्णीत आले.त्यानंतर त्यांच्या फक्त आठवणी उरल्या होत्या.कारण ते शेतकरी,शेतमजूर आणि नागरिकांचे प्रश्न सतत लावून धरत असल्याने एकट्या खासदारांनी केंद्र सरकारला हलवून ठेवले आहे. त्यामुळे शेवटच्या टोकावर असलेल्या आर्णी तालुक्यात यायला त्यांना वेळच मिळत नाही. मात्र आता त्यांना रविवारीचा मुहूर्त मिळाला आहे.त्यामुळे ते एका झटक्यात आर्णी तालुक्यातील लाखो नागरिकांचे प्रश्न सोडून जाणार आहे.


गेल्या दोन वर्षात शेतकरी त्यातच चेपट्या नाकाच्या देशाने आंदण म्हणून दिलेल्या कोरोना मुळे गरिब नागरिक अडचणीत असताना बाळू भाऊ कधीच फिरकले नाही.त्या मागची कारणे देखील तशीच आहेत. राज्यात एकटेच खासदार असल्याने ते नेहमी व्यस्त असतात. महिन्यातून दोन वेळा भेट द्यायला माजी मंत्री हंसराज अहीर एवढे थोडी खासदार रिकामे आहेत संपुर्ण राज्याचा कामकाज खासदारांना पाहावा लागतो.


गेल्या काही दिवसांपासून खुपच कृत्रिम महागाई,बेरोजगारी,खाजगीकरण, शेतकरी-कामगारांवर अन्याय चे प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्या नंतर लाडके खासदार बाळूभाऊ धानोरकर हे रविवारी आक्रमक मूड मध्ये दिसणार असल्याचे सांगितल्या जात आहे. त्यामुळे पोलीसांचा मोठा बंदोबस्त ठिक ठिकाणी लावल्या जाणार असल्याची माहिती आहे.काम करणाऱ्या लोक सेवकाला बाजुला करून बाळूभाऊंना मतदारराजांनी खासदार या पदावर बसविले आहे.त्यामुळे आधीच्या खासदारा पेक्षा जास्त काम करण्याची अपेक्षा आहे.मात्र दोन वर्षात कोणती विकास कामे मार्गी लागली याची वजा-बाकी त्यांनीच करणे गरजेचे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad