अशात राज्याचे माजी शिक्षण मंत्री वसंतराव पुरके यांनी माणिकराव ठाकरे आणि शिवाजीराव मोघे हे दोघेही निगेटीव्ह विचारांचे असल्याचे जाहीर म्हटले. ते यवतमाळ पासून सात किमी अंतरावर असलेल्या तळेगाव भारी येथे आदीवासी समाज प्रबोधिनी कार्यक्रमाच्या उदघाटन दरम्यान पुरके बोलत होते. यावेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे ह्याच्या हस्ते या प्रबोधिनी चे उदघाटन करण्यात आले.
माजी मंत्री वसंतराव पुरके बोलतांना पुढे म्हणाले की, कोरोना ने हाहाकार माजवला.त्यात लाखो नागरिकांचा जीव गेला. मला देखील कोरोना झाला होता. मात्र माजी मंत्री शिवाजीराव मोघे आणि माणिकराव ठाकरे हे निगेटिव्ह विचारांचे असल्याने ते कोरोना पाॅझिटिव्ह आले नाही, असे म्हतातच उपस्थित नागरिक खळखळून हसू लागले.