शिवसेना सचिव अनिल देसाई यांचे हस्ते बांधले शिवबंधन.
महाराष्ट्र24 | यवतमाळ जिल्हा परिषद पतसंस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्ष राजुदास जाधव यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.शिवसेना सचिव खासदार श्री अनिल देसाई यांचे हस्ते व यवतमाळ जिल्ह्याचे शिवसेनेचे नेतृत्व व माजीमंत्री आमदार संजय राठोड,शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांचे प्रमुख उपस्थितीत त्यांनी शिवबंधन बांधले. राजुदास जाधव हे यवतमाळ जिल्ह्यातील नामांकित व्यतिमत्व असून ते गेल्या अनेक वर्षांपासून सहकार चळवळीमध्ये सक्रिय आहेत.जिल्हा परिषद पतसंस्था त्यांचेच कार्यकाळात नावारूपास आली आहे.ह्याबरोबरच राजुदास जाधव हे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन मध्ये कार्याध्यक्ष असून यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत संचालक आहेत.त्याचबरोबर ते यवतमाळ जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे सुद्धा अध्यक्ष असून यवतमाळ जिल्हा पगारदार व नागरी पतसंस्था संघ मध्ये सुद्धा ते अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत.राजुदास जाधव हे बंजारा कवी,कीर्तनकार सुद्धा प्रसिद्ध आहेत.
शिवसेना वाढीसाठी काम करणार
येत्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद,पंचायत समिती व नगर पालिका निवडणुकीत पक्ष प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचे व जिल्ह्यामध्ये माजी मंत्री संजय राठोड यांचे नेतृत्वात झोकून देऊन काम करणार.स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडणून आणण्यासाठी मी माझे परीने प्रयत्नशील राहील.
राजूदास जाधव सेनेत पुढे काय?
शिक्षक नेते आणि कवी राजूदास जाधव हे नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केलाय. राजूदास जाधव यांना राजकारणाचे बाळकडू स्व. रामजी आडे यांच्या कडून मिळाले. मात्र ते आता शिवसेनेत गेल्याने काही महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची चर्चा सुरु आहे. तस झाल्यास राजूदास जाधव यांना राजकारणाचे बाळकडू देणारे स्व.रामजी आडे याचे सुपुत्र तथा युवा नेते अनिल आडे यांच्या सोबत टक्कर द्यावी लागणार असल्याची चर्चा सुरु आहे.