Breaking

Post Top Ad

शनिवार, १४ ऑगस्ट, २०२१

एका काॅग्रेस नेत्यांने आणले सेनेच्या संजय राठोडांना अडचणीत

एका काॅग्रेस नेत्यांने आणले सेनेच्या राठोडांना अडचणीत
महाराष्ट्र24 यवतमाळ: नुकताच भाजपनेत्या चित्र वाघ यांनी ट्विट करून माजी मंत्री तथा शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्या प्रकरणी स्पिड पोस्टने तक्रार केल्याचं म्हटल्या नंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली.


चित्रा वाघ यांच्या ट्विट नंतर काही तासात आमदार संजय राठोड यांनी पत्रकार परिषद घेऊन खुलास केला. "माझा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न सुरू आहे'. मात्र मी रडणारा नसून लढणारा आहेत" अशा निर्धार त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.


एकंदरीत आमदार संजय राठोड यांच्या विरोधात स्पिड पोस्ट ने केलेली तक्रार कोणाच्या सांगण्यावरून करण्यात आली, आमदार संजय राठोड यांना अडचणीत आणुन त्यांचा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न कोण करतेय तर यात काॅग्रेस च्या एका तरूण नेत्याचा हात असल्याचं समोर आले आहे.


आमदार संजय राठोड यांना अडचणीत आणणाऱ्या युवा काॅग्रेस नेत्याने कमी वयात मोठी प्रगती केली असून आर्थिक परिस्थिती सुद्धा चांगली जमविली आहे. ज्या गावातील महिलेच्या खांद्यावर बंदूक ठेवून आमदार संजय राठोड यांच्यावर निशाना साधल्या गेला.  जवळच्या लोकांना हाताशी धरून हा सर्व प्रकरण घडविण्यात आल्याची चर्चा काॅग्रेस सह त्या गावातील नागरिकांमध्ये सुरू आहे.

आमदार संजय राठोड यांना बदनाम करून त्यांचा राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करून आपण त्यांच्या जागी आमदारकी लढवण्याचा स्वप्न त्या काॅग्रेस नेत्याने बघितले आणि त्यातूनच हा सर्व प्रकार घडल्याची चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad