गेल्या दिड वर्षाच्या काळात लॉकडाऊनमुळे विविध क्षेत्रातील कंपन्या व व्यवसाय डबघाईस आले आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या असून कित्येकांवर नोकरी गमावण्याची वेळ आहे.
अशा परिस्थितीत देशातील आयटी कंपन्यांमध्ये मात्र नोकरीची संधी चालून येणार आहे. 2021 हे वर्ष आयटी क्षेत्रासाठी सकारात्मक बातमी घेऊन आले असून या क्षेत्रात चांगली रोजगार निर्मिती झाली आहे.
गेल्या काही काळात आयटी कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नोकरभरती झाली असून यावर्षी हाच ट्रेंड कायम राहणार असल्याचे संकेत आहेत. देशातील आघाडीचे आयटी उद्योग यावर्षी सुमारे 1 लाखाहून अधिक रोजगार मिळवून देण्याची तयारी करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे फ्रेशर्स विद्यार्थ्यांना यामध्ये संधी मिळणार आहे.
गत आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS या दिग्गज कंपनीला जबरदस्त नफा झाला होता. कंपनीला आणखीही अनेक प्रोजेक्टस मिळाली असल्याची माहिती आहे.
त्यासाठी TCS ला मनुष्यबळाची गरज असून कंपनीकडून 40 हजार पदे भरली जाणार आहेत. टीसीएस बाजारपेठ आणि कॅम्पस इंटरव्ह्यू अशा दोन प्रकारांनी कर्मचाऱ्यांची भरती करणार आहे.
भारतातील TCS आणि Infosys या दोन आघाडीच्या कंपन्यांनी लॉकडाऊनच्या काळातही मेगाभरतीचा प्लॅन आखला आहे. यापैकी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मध्ये तब्बल 40 हजार पदांसाठी भरती सुरु होणार आहे. गेल्यावर्षीही कंपनीने एवढ्याच लोकांची भरती केली होती.
भारताची दुसर्या क्रमांकाची आयटी कंपनी इन्फोसिस 2021-22 या आर्थिक वर्षात कॅम्पसमधून 26 हजार फ्रेशर्सना नोकरीची संधी देणार आहे. उत्पादनांची मागणी वाढत असताना एट्रिशन रेटमध्ये वाढ झाल्यामुळे नव्या पदांची भरती करण्यात येणार असल्याचे Infosys कडून सांगण्यात आले आहे.
भारतात माहिती तंत्रज्ञान ( IT) क्षेत्रात पुन्हा एकदा तेजी परतत असून, 53 टक्के कंपन्या नवी नोकर भरती करण्यासाठी, तर 60 टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घसघशीत वेतनवाढ देण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.
2020 साली कोरोनाचा कहर व त्यामुळे देशभरात करण्यात आलेले लॉक डाऊन तसेच जगभरात कोरोनामुळेच ठप्प पडलेले सर्व व्यवसाय यामुळे आयटी क्षेत्रातील कंपन्यांची नोकर भरती घसरली होती.
तसेच मोठ्या प्रमाणात नोकर कपातही करण्यात आली होती. आता परिस्थिती सुधारल्याचे दिसून येत आहे. कोरोनामुळे गतवर्षी अभियांत्रिकी शाखेच्या परिक्षांवरही परिणाम झाला होता.
भविष्यात नोकरीसाठी अडचण येईल अशी शंकाही विद्यार्थी वर्गातून व्यक्त होत होती. मात्र आयटी उद्योगातील या गुड न्यूज मुळे निदान संगणक अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी हि दिलासादायक बातमी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response