महाराष्ट्र२४ । मुंबई: सध्या सगळीकडे एकच चर्चा सुरू आहेत ती म्हणजे लाॅकडाऊन संदर्भात. येत्या १ जुन पासून लाॅकडाऊन उठवल्या जाईल की, पुन्हा वाढलेल्या जाईल या बाबत व्यापारी सह सामान्य नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. मात्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी या बाबत मोठे विधान केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी लाॅकडाऊन बाबत महत्वाचे विधान केले असून एक जुन नंतर ताबडतोब सर्व काही उघडेल असे नाही.राज्यात लाॅकडाऊन हळूहळू उघडावा लागणार आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यात कोरोना संसर्गाची स्थिती नेमकी कशी आहे.हे पाहून लाॅकडाऊन बाबत निर्णय घेतल्या जाईल असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.
