Breaking

Post Top Ad

मंगळवार, २३ मार्च, २०२१

महागावच्या मुख्याधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची नोटीस: प्रशासनात खळबळ

महागावच्या मुख्याधिकार्‍यांना जिल्हाधिकार्‍यांची नोटीस: प्रशासनात खळबळ
यवतमाळ: वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता महागांवचे नगर परिषदेचे मुख्यधिकारी यांनी मुख्यालय सोडल्या प्रकरणी त्यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील हे प्रकरण प्रशासकीय स्तरावर चांगलेच गाजत असून याबाबत कोविड सारख्या महामारी मध्ये असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्याने वरिष्ठांच्या पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे चांगले भोवले आहे.

मुख्याधिकारी सुरज सुर्वे नगर पंचायत महागाव यांनी संदर्भ क्रं . १ च्या अर्जानुसार दि.२७ जानेवारी ते १८.फेब्रुवारी या २२ दिवसांचा कालावधी करिता रजेचा अर्ज सादर केला होता.परंतु सद्यस्थितीत शहरात कोव्हीडजन्य परिस्थिती उद्भवली असल्याने तसेच  सुर्वे हे विना परवानगीने मुख्यालय सोडल्यामुळे त्यांचा रजेचा अर्ज नाकारण्यात आला.

त्यांना त्याबाबतचे संदर्भीय क्रं.३ च्या पत्रानुसार कारणे दाखवा नोटीस बजावली असतांना सुद्धा त्यांचा खुलासा अप्राप्त असुन अद्यापही ते मुख्यालयात हजर नाहीत. सबब संदर्भिय क्रं . २ च्या शासन परिपत्रकानुसार कोव्हीड -१९ सारख्या संक्रमक आजाराच्या पार्श्वभुमीवर आवश्यक उपाययोजनांसाठी मुख्याधिकारी यांना मुख्यालयात राहुन उपाययोजना करणे आवश्यक आहे. असे असतांना सुद्धा मुख्याधिकारी सुर्वे हे पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडुन अनधिकृतरित्या गैरहजर आहेत.  ही बाब शासकिय कामकाजाच्या दृष्टीने शिस्तभंग विषयक आहे.त्यांचेवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार विभागीय चौकशी प्रस्तावीत करण्याकरिता सदरचा प्रस्ताव सविनय सादर करण्यात येत असल्याचे रीतसर पत्र जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंह यांनी शासनाला दिल्याने प्रशासनामध्ये मोठी  माजली खळबळ  आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad