Breaking

Post Top Ad

मंगळवार, २३ मार्च, २०२१

जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट

जिल्ह्यात कोरोनाचा पुन्हा विस्फोट
यवतमाळ गेल्या २४ तासात जिल्ह्यात १० मृत्युसह ५५६ जण नव्याने पाॅझिटिव्ह  आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या २८६ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

मंगळवारी एकूण ५४०४ रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी ५५६ जण नव्याने पाॅझिटिव्ह आले तर ४८४८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात २२२५ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या २५३९६ झाली आहे. २४ तासात २८६ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या २२५८८ आहे. तर जिल्ह्यात एकूण ५८३ मृत्युची नोंद आहे.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ येथील ७५, ७८, ६२, ७१ वर्षीय पुरुष आणि ६०, ६५ वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील ५० वर्षीय महिला, दिग्रस येथील ५२ वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील ६२ वर्षीय पुरुष आणि मानोरा (जि. वाशिम) येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच आज (दि.२३) पॉजिटिव आलेल्या ५५६ जणांमध्ये ३९३ पुरुष आणि १६३ महिला आहेत. यात यवतमाळातील २३४, राळेगाव ५९, दारव्हा ५३, उमरखेड४०,दिग्रस ३९, पांढरकवडा ३९, पुसद २९, कळंब २३, नेर १३, वणी ६, बाभुळगाव ६, घाटंजी ५,आर्णी ३, मारेगाव २, झरीजामणी २ आणि ३ इतर शहरातील रुग्ण आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad