Breaking

Post Top Ad

सोमवार, २ नोव्हेंबर, २०२०

जिल्ह्यातील या सहा न.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यातील या सहा न.प.च्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

यवतमाळ : जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आरक्षण व सोडत कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यात अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग / नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलासाठी आरक्षण निश्चित करण्याकरीता सोडत काढणे तसेच प्रभाग रचनेचे प्रारुप प्रसिध्द करण्यासाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे.

मारेगाव नगर पंचायतीसाठी आरक्षण मंगळवारी दि. १० नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजता नगर पंचायत कार्यालयाचे सभागृह, मारेगाव येथे होईल. महागाव नगर पंचायतीसाठी आरक्षण सोडत मंगळवार दि. १० नोव्हेंबर ला रोजी दुपारी १२ वाजता तहसील कार्यालय, महागाव येथे होईल. बाभुळगाव नगर पंचायतीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी दि. १० नोव्हेंबर रोज सकाळी ११ वाजता सांस्कृतिक भवन, पोलिस स्टेशनजवळ, बाभुळगाव होईल. 

राळेगाव नगरपंचायतीसाठी आरक्षण सोडत मंगळवारी दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय कार्यालय सभागृह, राळेगाव येथे होईल.  झरी नगर पंचायतीसाठी आरक्षण सोडत मंगळवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता तहसील कार्यालय, झरीजामणी येथे होईल. कळंब नगर पंचायतीसाठी आरक्षण सोडत दिनांक मंगळवार दि. १० नोव्हेंबर  रोजी सकाळी ११  वाजता नगर पंचायत कार्यालय सभागृह, कळंब येथे पार पडणार आहे.

मारेगांव, महागांव,कळंब,झरी,राळेगांव आणि बाभुळगांव या सहा नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरीता प्रभाग रचनेचे प्रारुप प्रसिध्द करण्याचा दि.१८ नोव्हेंबरला आहे. तसेच हरकती व सुचना सादर करण्याचा कालावधी १८ नोव्हेंबर ते २६ नोव्हेंबर  दुपारी ३ वाजेपर्यंत राहील. हरकती व सुचना मुख्याधिकारी नगर परिषद / नगर पंचायत यांच्याकडे निवडणूक कार्यालय अथवा संबंधित प्रभाग कार्यालयाचे मुख्यालय येथे सादर कराव्यात. हरकती व सुचना दाखल करणा-या नागरिकांना सुनावणीकरीता उपस्थित राहण्यासाठी स्वतंत्रपणे कळविण्यात येईल, असे संबंधित नगर पंचायतींच्या मुख्याधिकाऱ्यांनी कळविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad