Breaking

Post Top Ad

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

सनातन सारथी श्रीसत्यसाई !

 

सनातन सारथी श्रीसत्यसाई !

'माणसाचा जन्म होतो हे शिकण्यासाठी की पुन्हा त्याचा जन्मच होऊ नये' असे जीवनाचे प्रयोजन सांगणाऱ्या सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा या मानवी मूल्यांची शिकवण देणाऱ्या, माणसाला माधवा कडे नेण्याचा मार्ग दाखविणाऱ्या, मानव सेवा हीच माधव सेवा आहे ,प्रेम हेच जीवनाचे प्रयोजन आहे, जीवनाचा आधार आहे,सर्व काही प्रेम आहे असे सांगणाऱ्या  पूर्णावतार श्री सत्यसाई बाबा यांचा दि. २३ नोव्हेंबर २०२० हा ९५ वा  जन्मदिन.यानिमित्त्य त्यांच्या महासागराईतक्या विशाल कार्याचा परिचय एका थेंबातून देण्याचा हा अल्पसा प्रयत्न आहे. 


मानवी जीवनात अद्भूत असे काही अविस्मरणीय क्षण येतात की त्यांच्या केवळ स्मरणाने मानवी जीवनाचा कंटकाकीर्ण वाटत असलेला लोकांचा प्रवास अतिशय सुखकर होतो. माझ्याही जीवनात असे दोन क्षण आहेत. दि.१४ जानेवारी १९९४ हा संक्रांतीचा दिवस अणि ९ मार्च १९९७ जानेवारी दि.१४ (१९९४) ला पुटपर्ती येथे प्रशांती निलयम आश्रमात श्री सत्यसाईबाबा यांनी रंग मंचावरून चालत येऊन दोन फूट अंतरावरून दर्शन देत हस्त उंचावत आशीर्वाद दिला.संक्रांतीचा तो दिवस म्हणजे परिवर्तनाचा अविस्मरणीय दिवस. क्षणात सारा अहंकार गळून पडला.दुसरा क्षण ९ मार्च १९९७ ला व्हाइट फील्ड बंगलोर येथे स्वामींनी अक्षरशः जवळ घेऊन दिलेले आलिंगन,पाठीवर दिलेल्या प्रेमाच्या तीन थापाआणि हवेतून निर्माण करून दिलेली दोन खड्यांची आंगठी.डाव्या हाताच्या करंगळी जवळील बोट धरुन स्वामींनी स्वत: ती आंगठी घालून दिली आणि म्हणाले,. " देखो करेक्ट साईज की बनाया".  या दोन्ही क्षणाईतके आयुष्यात अविस्मरणीय काहीही नाही असे मला वाटते.


श्री सत्य साईबाबा म्हणतात की   तुमचे जन्मदिवस दोन प्रकारचे असतात. एक भौतिक आणि दुसरा अध्यात्मिक,भौतिक म्हणजे ज्या तारखेला ,तिथीला तुम्ही जन्माला आले तो दिवस .अध्यात्मिक जन्मदिन  म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला परमेश्वराच्या अस्तित्वाची अनुभुती  येते तो दिवस होय.  स्वामी म्हणतात अध्यात्मिक जन्मदिन हाच खरा होय.   म्हणूनच मी १४  जानेवारी हा मी माझा जन्मदिन मानतो. श्रीसत्यसाई सेवा संघटनेचे ज्येष्ठ पदाधिकारी रमेश सावंत यांनी सनातन सारथी या भगवान बाबांच्या मासिक विशेषांकात लिहिलेल्या अर्पणपत्रिकेत म्हटले आहे की ईश्वर हा फक्त मंदिरात नाही तो चराचरात आहे. ईश्वराचा बाहेर शोध घेण्याचं थांबवा, आणि आतल्या शोधाला सुरुवात करा असे श्री सत्यसाईबाबांनी वारंवार सांगितले आहे.

प्रा.न.मा.जोशी  ८८०५९४८९५१

सनातन सारथीच्या संपादकीयामध्ये मंगला मिरासदार म्हणतात की श्रीसत्यसाई युगावताराने बालविकास पासून तर विद्यापीठ स्तरापर्यंत शिक्षण संकुलाची उभारणी, आधुनिक वैद्यकाने सुसज्ज असे सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल,माणसाचे माणूसपण जागे करणारे अध्यात्म तहानलेल्या जीवांसाठी पाणी प्रकल्प असे अनेक प्रकल्प साकार केले आहेत.! मानव सेवेतच  ईश्वर सेवा सामावलेली आहे.त्यातूनच आरोग्य सेवा,वैद्यकीय शिबिरे, पाणी प्रकल्प, निसर्ग कोपाने संकटग्रस्त झालेल्यांना मदत इत्यादी सेवा कार्य केले आहे. श्रीसत्यसाईबाबांनी वेदज्ञानाचा अमूल्य ठेवा केवळ जपला नाही तर तो आत्ताच्या पिढीपर्यंत आणला आहे .प्रशांति निलयम मध्ये श्री सत्यसाई वेदशास्त्र पाठ शाळेची स्थापना झालेली आहे.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जपानमध्ये सत्यसाई सनातन संस्कृती या अध्यात्मिक केंद्राचा शुभारंभ केला. सत्यसाईबाबांची देवत्व भारतीय संस्कृतीच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान जगात परिवर्तन घडून आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे की, त्याग आणि तपश्चर्येच्या संत परंपरेने मधील अत्यंत तेजस्वी तारा भगवान श्री सत्यसाईबाबा आहेत त्यांनी अध्यात्मिकता कल्याण कडे वळवली अध्यात्म कर्मकांडाची जोडले नाही तर ते आणि परिवर्तनाशी जोडले.मला त्यांच्या निकटतेचा लाभ मिळाला जे परम भाग्य आहे. संत रमेशभाई ओझा म्हणतात की पूजनीय, स्नेह, समर्पण , आणि प्राथ आध्यात्मिक   चेतनेचे मूर्तीमंत उदाहरण श्रीसाईबाबा एका अलौकिक पुरुषाच्या रूपात आपल्यासमोर प्रकट झाले आणि सत्कर्म ,सेवा, भक्ती आणि प्रज्ञेच्या प्रकाश देऊन अंतर्धान पावले.


सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दिवंगत पद्मविभूषण पी एन भगवती स्वामींचा संदेश देताना म्हणतात की, प्रार्थना करणाऱ्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात अधिक पवित्र आहेत, हा सुंदर विचार स्वामींनी  मांडला आहे.मानव सेवा हीच माधव सेवा अस भगवान बाबा  नेहमी सांगतात. सर्वांवर प्रेम करा, कुणाचाही द्वेष करू नका हा बाबांचा संदेश आहे.बाबा म्हणतात,प्रेम म्हणजे देव. प्रेमात जगा. प्रेम वृद्धिंगत करा. प्रत्येकावर मनापासून प्रेम करा. जेव्हा प्रेमाचा अविष्कार होईल तेव्हाच तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी म्हटले आहे की ब्रह्मराजर्षीरत्नाढय भारतवर्षाला भगवंताचे यदायदाही धर्मस्यग्लानीर्र्भवती  भारत हे अभिवचन वरदान या नात्याने प्राप्त झालेले आहे.


अर्थकामांना नियंत्रित करणाऱ्या धर्माचे देश कालसुसंगत अनुशासन परिभाषेत करणारे, त्याला मूळ असलेली अध्यात्मिक प्रतीती स्वत: बाळगून अधिकारपरत्वे प्रदान करू शकणारे व त्यावेळच्या समाजाचे आर्तनिवारण करणारे ईश्वरांश भारतभूमीवर नित्य अविरभूत होऊन येथील समाजामध्ये प्रज्ञा शील करुणा आणि सेवावृत्ती व श्रद्धा जागृत ठेवत असतात.भगवान श्री सत्यसाईबाबा याच कोटीतीलच शरीरधारी ईश्वरांश होते.सृष्टीनियमात राहून त्यांनी अकालानुक्रमे पार्थीव त्याग केला असला तरी त्यांचे अस्तित्व नित्य आहेच याची प्रचिती अनेक भक्तजनांना प्रत्यक्ष अनुभव सांगत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की सत्य सदाचरण शांती प्रेम या वैश्विक आवाहनातून विवेकाद्वारा मानवजातीच्या नैतिक आणि अध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पितअसलेल्या  अद्वितीय कार्य करणाऱ्या भगवान श्री सत्यसाईबाबा ही काळाची गरज आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की,मूल्याधिष्ठित शिक्षण आणि जीवन पद्धतीला भगवान श्री सत्यसाईबाबांनी ज्ञान आणि विज्ञानाची जोड दिली. शिक्षण आरोग्य पाणी आज या क्षेत्रात स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली श्री सत्यसाई सेवा संघटनेचे काम देशात आणि जगात उभे केले आहे ते अद्वितीय आहे.आतापर्यंत तीन वेळा मला भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या दर्शनाची संधी मिळाली.


भारतीय प्रशासकीय सेवेतील आणि श्री सत्यसाई सेंट्रल ट्रस्टचे विश्वस्त श्री के चक्रवर्ती यांनी म्हटले आहे की माणसाच्या मस्तकात माहिती कोंबड्याने आणि मानवी मुले नसलेल्या बुद्धीचा विकास करण्याने अशी बुद्धी निरुपयोगी ठरते असे नव्हे तर विनाशकारी होते याला इतिहास साक्ष आहे.कुशाग्रता वाढवण्यापेक्षा चारित्र्य निर्माण हा कडे जास्त लक्ष दिले पाहिजे.श्री सत्यसाई बाबांच्या ९५ व्या जन्मदिनानिमित्त सनातन सारथी मासिकाचा अप्रतिम असा विशेषांक डॉक्टर चक्रपाणी  जोशी यांच्या संपादनात प्रसिद्ध झाला आहे त्यात रमेश सावंत,मंगला मिरासदार,निमिष पंड्या अशोक चव्हाण ,स्वामी सद्योजत    मेधजानंद स्वामी, सद् डॉक्टर झूम साई,युको हिरा, सुनील गावस्कर वेळू श्रीनिवासन,अनिल कुमार रमेश वाधवानी,अजित पोपट,उस्ताद अमजद अली खान,पद्मजा फेणाणी जोगळेकर, शम्मी परांजपे,करुणा स्वरूप मुंशी,साई कौस्तुभ दास गुप्ता, ज्युली चौधरी,सुब्रमण्यम गोरटी,अविनाश कुलकर्णी,के.नरसिंहन,विवेक कदंबी,अंजली साठे,अशोक सिंघल,शशांक शहा,बी. जी. पित्रे, मनोरमा साठे यांचे अनुभव,राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनोगत प्रसिद्ध झाले आहे. अत्यंत सुबक सुंदर छपाई,अप्रतिम दर्जाचा कागद,आणि भगवान बाबांचे छायाचित्र असलेले मुखपृष्ठ असलेला सनातन सारखी चा हा अंक प्रत्येकाने संग्रही ठेवावा असा आहे.भगवान श्री सत्यसाईबाबा यांच्या चरणकमलाशी प्रेमपूर्ण आणि विनम्र प्रणाम !

(लेखक हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक असून जेष्ठ पत्रकार) 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad