आर्णी (यवतमाळ) येथील एका पत्रकाराने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आनंद लोकरे यांना दहा हजार रूपयांची खंडणी मागुन अश्लील शिवीगाळ करित जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी आर्णी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान या प्रकरणी गटविकास अधिकारी लोकरे यांनी पोलिसात तक्रार दिल्या नंतर पोलीसांनी विविध कलमा नुसार संबधित पत्रकार यांच्या वर गुन्हे दाखल केले. दि.१८ ते २१ नोव्हेंबर दरम्यान घटनेतील आरोप याने गटविकास अधिकारी यांना सतत भ्रमणध्वनी वरून दहा हजार रूपयांची मागणी केली.पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देत तू आर्णीत कशा राहतो व अश्लील भाषेत शिवीगाळ केल्या प्रकरणी पोलीसांनी गुन्हे दाखल केले आहे.
सुर्याचा प्रकाश जिथे,जात नाही तिथे पत्रकारांच्या कॅमेऱ्याचा लाईट पडला पाहीजे आणि जी घटना समाजाला माहिती नाही,ती सत्य घटना लोकांपर्यंत पोहचविण्याचे कार्य पत्रकारांच्या माध्यमातून करण्याचे काम पत्रकार करतात.मात्र सध्या टोकाची व्यावसायिकता आणि पैशाभोवती फिरणारी पत्रकारिता सुरू आहे.त्यामुळे असले प्रकार घडत आहे.
'तो अधिकारी डोळा ठेवूनच'
खंडणी मागीतल्या प्रकरणी 'ज्या पत्रकारावर' गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्या पत्रकाराचा आणि एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या काही वर्षापासून छत्तीसचा आकडा आहे.त्यामुळे तो अधिकारी या प्रकरणावर बारीक डोळा ठेवून असल्याची माहिती आहे.
आज 'ज्या पत्रकारांवर' खंडणी सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहे.त्या पत्रकारांच्या मदतीला 'त्या' वृत्तपत्राचा मालक अथवा संपादक मदतीला येणार नाही आहे.तुम्ही केलात,तुम्हालाच त्याचे परिनाम भोगावं लागणार आहे.पत्रकारांनी अधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी कशासाठी केली? संपादक अथवा वृत्तपत्राच्या मालकाने पैशाची मागणी करा म्हणुन स्थानिक पत्रकारांना सांगितले नाही,तरीही रात्री बे रात्री अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरून संपर्क करून बेधडक पैशाची मागणी करणे चुकीचे आहे.याचे समर्थन कोणीच करणार नाही.
सध्या आर्णी शहरात काही जणांकडून पत्रकारिता नासवण्याचा प्रकार सुरू आहे.या प्रकारला अधिकारी आणि जागृत नागरिक कंटाळले आहे.विशेष म्हणजे नावा सहीत एका पत्रकारावर गुन्हा जरी दाखल करण्यात आला असाला तरी त्यात अजून चार जणांचा समावेश होण्याची दाट शक्यता आहे.वेगवेगळ्या नंबर वरून फोन करून गटविकास अधिकारी यांना धमकी देण्यात आल्याने त्या अनोळखी मोबाईल नंबरची पोलीस चौकाशी करणार आहे.
