Breaking

Post Top Ad

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

कार-दुचाकीची समोरा समोर धडक

 

कार-दुचाकीची समोरा समोर धडक

मरसुळ फाट्या नजीकची घटना 

उमरखेड (यवतमाळ) : पुसद कडून उमरखेडकडे येणाऱ्या इनोव्हा कारची दुचाकीला धडक लागून दुचाकी व कार मध्ये जबरदस्त समोरा-समोर धडक झाल्याने मोठा अपघात झाला.ही घटना रविवारी सकाळी दरम्यान मरसुळ फाट्या जवळ घडली.


इनोव्हा कार क्रमांक एम. एच.२३ ए. डी. ५७८८ या वाहनाची मरसुळ कोविड सेंटरमधून उमरखेड येथे येणाऱ्या प्रशांत सदाशिव पांडे रा.उमरखेड यांच्या एम. एच. यू.६०९३ या क्रमांकाच्या दुचाकीला जबरदस्त धडक लागून त्यानंतर कार झाडावर आदळली रस्त्याच्या कडेवर असलेले झाड उन्मळून पडले.

कार-दुचाकीची समोरा समोर धडक

कार चालक आयूब बेग, सालार बेग रा.बीड याचे सह कारमधील प्रवाशी डॉ. राजू पंढरीनाथ उन्हाळे बीड, बंडोपंत नारायण सोंदनकर हदगांव, संजय प्रभाकर सोंदनकर, हदगांव यांचे सह दुचाकीस्वार प्रशांत सदाशिव पांडे रा, उमरखेड हे गंभीररित्या जखमी झाले असून यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.प्रत्यक्षदर्शीनी त्यांना उमरखेडच्या शासकिय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना तिथून तत्काळ नांदेड येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad