Breaking

Post Top Ad

रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

'या शिक्षक उमेदवारांकडून रक्कम जप्त'

'या शिक्षक उमेदवारांकडून रक्कम जप्त'

अमरावती पदवीधर मतदार संघाची निवडणूक रणधुमाळी अंतिम टप्यात आहे.त्या अनुषंगाने सर्वच उमेदवार आपल्या आपल्या पद्धतीने सर्व ताकत पणाला लावताना दिसत असताना आर्णी येथील ड्रीम लाॅन्ड सिटी मध्ये वाशिम जिल्ह्यातील तीन शिक्षक 'पैठणी साड्या' वाटप करित असल्याची माहिती यवतमाळ येथील भरारी पथकाला मिळाल्याने ४९ सांड्या आणि रोख २७ हजार रूपये जप्त करण्यात आले.

तो उमेदवार कोण?


वाशिम जिल्ह्यातील तीन शिक्षकांनी साड्या आणि पैसे वाटप करताना पकडण्यात आले.त्यामुळे पकडण्यात आलेले शिक्षक कोणत्या उमेदवाराचे आहे? आणि संबधित उमेदवारावर कधी कारवाई होईल अशा सवाल या निमित्ताने विचारला जात आहे.

आर्दश समाज घडविणारे सज्ञान शिक्षक जर आदर्शवाद गुंडाळून बाजूला ठेवून जर असे वागत असतील तर खरच यांना ज्ञान देण्याचा अधिकर आहे का? निवडणूक प्रचार करिता थेट वाशिम जिल्ह्यातील तीन शिक्षक आर्णी येथील ड्रीम लाॅन्ड सिटी परिसरात साड्या आणि पैसे वाटप करताना यवतमाळ येथील भरारी पथकाने रंगेहात पकडले.त्यामुळे कारवाई कधी होईल या कडे लक्ष लागले आहे.
कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad