कायम विविध कारणाने चर्चेत राहणारे आणि वसंतराव नाईक स्वालंभन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी पुन्हा त्यांच्या कडून मोठी चुक झाल्याने ते चर्चेत आले आहे.प्रसिद्धी साठी नेते मंडळी कोणत्या टोकाला जातात हे तिवारींनी पांढरकवडा येथील कार्यक्रमात दाखवून दिले आहे.
महात्मा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त पांढरकवडा येथील व्यापारी संघटने कडून गरजू लोकांसाठी ऑक्सिजन सिलेंडर ची व्यवस्था दि.२ ऑक्टोबर पाहून म्हणजे गांधी जयंती पासून सुरू करण्यात आली. या कार्यक्रमाचे उदघाटन करिता किशोर तिवारी, पांढरकवडा पोलीस स्टेशन चे ठाणेदार रामकृष्ण महल्ले तथा आदी स्थानिक पदधिकाऱ्यांना बोलवण्यात आले होते.
'वयोवृद्ध लोकांनी नियमाचे पालन करणे आवश्यक'
सध्या कोरोना महाराष्ट्रात धुमाकूळ घालत आहे.त्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना आटोक्यात आणण्यासाठी 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' हा उपक्रम सुरू केले.उपक्रमाची अंमलबजावणी सुध्दा काटेकोरपणे सुरू आहे.मात्र वयोवृद्ध किशोर तिवारी केवळ प्रसिद्धी माध्यमांना फोटो देण्यासाठी स्वतः तोंडावरचा मास्क काढून दुसऱ्यांना देखील मास्क काढण्यासाठी भाग पाडत असल्याचा व्हिडिओ सोशल मिडीया जोरात फिरत आहे.त्यामुळे किशोर तिवारी यांच्या वर साथरोग कायद्या अंतर्गत कारवाई होणार का अशा सवाल सामान्य नागरिकांना पडला आहे.एरवी सामान्य नागरिक विना मास्क चे फिरताना आढळून आल्यास त्यांच्या कडून दंड वसूल केल्या जाते.मग तिवारी सार्वजनिक ठिकाणी विना मास्क चे असताना दिसत असेल तर त्यांच्या वर प्रशासनाने कारवाई का करू नये अशा सवाल या निमित्ताने उपस्थितीत होत आहे.
ऑक्सिजन सिलेंडर या कार्यक्रमाचे उदघाटन दरम्यान फोटो काढण्यासाठी किशोर तिवारींनी कोविड पासून बचाव करणारा त्यांच्या तोंडावरील माॅक्स काढला,तद्नंतर तिवारींनी ठाणेदार महल्लेंना माॅक्स काढण्याची विनंती केली.मात्र ठाणेदारांनी शेवट पर्यंत त्यांच्या तोंडावरील माॅक्स काढला नाही.सरकार कडून 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' हि मोहीम संपुर्ण राज्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी राबवण्यात येत आहे.राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'माझे कुटुंब,माझी जबाबदारी' हा उपक्रम यशस्वी राबवण्यासाठी प्रशासनातील तसेच सर्व लोकप्रतिनिधींना कडक सुचना दिल्या आहे.मात्र त्यांच्या पक्षातील जवाबदार पदाधिकारी 'सरकार'ने सुरू केलेल्या उपक्रमाची सार्वजनिक ठिकाणी फज्जा उडवल्याने सामान्य नागरिकांतून तिवारींवर टिकेची झोड उठत आहे.
