नागपूर-तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावरील अर्जूना घाटात भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडल्याची घटना घडली असून यात एक जण जागीच ठार झाल्याची माहिती आहे.
यवतमाळ नजिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अर्जना घाटात भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने रविवारी दुपारी दरम्यान जोरदार धडक दिल्याने यात एक जण जागिच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.घटनेतील दुचाकी क्रमांक एम.एच.१४ बी.एल.५९७५ या दुचाकीला मागुन भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.
त्यामुळे एक जण जागीच ठार झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. घटनेतील गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला तातडीने यवतमाळ येथील स्व.वंसतराव नाईक शासकीय महाविद्यालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले.मात्र मृतकाची ओळख उशीरा पर्यंत पटली नाही.
