Breaking

Post Top Ad

रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

'भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश'

'भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश'
ना.संजय राठोड यांचे हस्ते बांधले शिवसबंधन

यवतमाळ शहरातील प्रभाग क्रमांक १३  मधील युवकांनी जिल्हा प्रमुख पराग पिंगळे व जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या संख्येने शिवसेनेत प्रवेश केला.यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे वनमंत्री संजय राठोड,युवासेना जिल्हा विस्तारक दिलीप घुगे,यवतमाळ शहराच्या नगराध्यक्ष सौ कांचनताई चौधरी,माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार,माजी नगराध्यक्ष बाळासाहेब चौधरी,शिवसेना गटनेते गजानन इंगोले हे ह्या प्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते. 

प्रत्येक आठवड्यात प्रभाग निहाय प्रवेश घेणार 

पक्ष प्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे,युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे व यवतमाळ जिल्ह्यात ना संजय राठोड यांचे नेतृत्व आणि कर्तृत्वावर विश्वास दाखवून युवक शिवसेनेकडे आकर्षित होत आहेत.येत्या काळात होणारी यवतमाळ नगरपालिका निवडणूक पाहूण शिवसेनेत प्रभाग निहाय बैठका व प्रवेश सोहळावे आम्ही घेणार आहोत.यवतमाळ नगर पालिका निवडणूक स्वबळावर जिंकण्याचा शिवसेनेचा मानस असल्याचा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी व्यक्त केला आहे.

भारतीय जनता युवामोर्चाचे माजी सरचिटणीस तुषार देशमुख यांचे नेतृत्वात आज प्रभाग तेरा मधील भाजप कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.तुषार देशमुख यांनी भाजप मध्ये जिल्हा सरचिटणीस भाजपा युवा मोर्चा,भाजपा विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख,तालुका सरचिटणीस भारतीय जनता युवा मोर्चा, माजी छात्रसंघ सचिव अमरावती विद्यापीठ ही विविध संघटनात्मक पदं भूषविली आहेत तसेच त्यांनी लोहारा ग्रामपंचायतीचे माजी ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य केले आहे.

प्रभाग २१ मधील युवकांचा सुद्धा प्रवेश 

याच प्रसंगी शिवसेना व्यापारी आघाडी शहर प्रमुख संतोष चव्हाण यांचे पुढाकारात यवतमाळ शहर प्रभाग २१ मधील लक्ष्मण उईके,करण लांडगे,रोशन गेडाम,अनिकेत नगराळे,अभिजित कनाके,विक्की डोंगरे,अनिल ध्रुवे,नरेंद्र तुरी,नवनीत हलवी,किसन राठोड,दीपक बत्रा यांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधले.या प्रसंगी शिवसेना नगर सेवक अनिल यादव,उद्धव साबळे,पंकज देशमुख,निलेश बेलोकर,रवी राऊत,गोलू जोमदे,अमोल धोपेकर,हृषीकेश इलमे,अतुल कुमटकर,शाम थोरात,राहुल गंभीरे,डॉ प्रसन्न रंगारी इत्यादि शिवसेना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी उपस्थित होते. 
'भाजप पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश'

तुषार देशमुख यांचे सोबत नितीन धांदे,विलास अवघड,विलास अवघड,संदीप साबळे,विठ्ठल वेरुळकर,विलास जाधव,मधुकर लोहकुरे,चंद्रशेखर जगताप,अरविंद इरखडे,नारायण केवट,संदीप केरीकर, दिलीप कुरेकर,तारेणी मोहंती,अनिल कुसवाह, राकेश उपाध्याय,राकेश पेटकुळे,हितेश तिनघाशे, मंगेश गाडगे,परमेश्वर आरेकर,हिम्मतराव वाघ,अमोल गोरमाळे, उमाकांत नाईक,देवेंद्र वावरकर,रोशन गोल्हर,योगेंद्र ओरोडीया,किशोर कुकडे,राहुल गुल्हाने,गजानन खोटे,अंकुश खोपडे,श्रीरंग खवासे,अजय निळे,योगेश शिलाने,सुरेश भुयार,चेतन ठमके,राजू लडी, निलेश देशमुख,श्रीकांत कोल्हे,दिविदास चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन शिवबंधन बांधले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad