महागांव तालुक्यातील फुलसावंगी नजिक असलेल्या चिल्ली शेत शिवारात शेतकरी आणि त्याच्या पत्नी वर विज पडल्याने यात शेतकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून मृतकची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
सध्या शेतात शेतीचे कामे सुरू आहे.अशात आज दि.३ सप्टेंबर ला दुपारी साडे तीन वाजता दरम्यान चिल्ली शेत शिवारात शेतकरी आणि त्यांची पत्नी काम करत असताना वीज पडली.यात अल्पभूधारक शेतकरी विलास भुमा राठोड यांचा जागीच मृत्यू झाला तर मृतकची पत्नी नामे ललीताबाई भुमा राठोड हि गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
मृतक भुमा राठोड हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्या कडे दोन एकर शेती आहे. चिल्ली शेत शिवारात दुपारी साडे तीन वाजता दरम्यान अचानक धुवांधार पाऊस सुरू झाला आणि त्यातच वीज पडली.यात मृतक शेतकरी भुमा राठोड हे जागीच ठार झाले तर ललिता बाई राठोड हि गंभीर जखमी झाली.घटनेची माहिती मिळताच सामाजीक कार्यकर्ते आणि परिसरातील शेतकरी व शेतमजुर यांनी धाव घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thanks For Your Valuable Response