Breaking

Post Top Ad

शनिवार, ५ सप्टेंबर, २०२०

नगरसेवकांने 'शेतकरी नेत्यांच्या' कानाखाली काढला आवाज

 

नगरसेवकांने 'शेतकरी नेत्यांच्या' कानाखाली काढला आवाज
बजाओ टाळी

पांढरकवडा येथील घटना

नको तिथे 'नाक' खुपसण्याची सवय कशी अंगलट येते हे पांढरकवडा येथील घटलेल्या घटनेतून समोर आली आहे. शेतकरी नेत्यांच्या कानाखाली नगरसेवकांने आवाज काढल्याची माहिती जिल्ह्यात हव्या सारखी पसरल्याने जिकडे तिकडे एक प्रकारे उत्साह साजरा केल्या जात असल्याचे चित्र आहे.


पांढरकवडा येथील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वडिलांचे आज दि.५ सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यामुळे चुलत 'काका'चे निधन झाल्याने संबंधित पालिकेचा नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक हा देखील त्या ठिकाणी बाजुला बसुन होता. तेवढ्यात नौटंकी करणारा आणि स्वयंम घोषीत शेतकरी नेता हा त्या ठिकाणी पोहचला.अन् अचानक सपासप कानाखाली आवाज काढत असल्याची घटना त्या दरम्यान घडल्याने उपस्थिती नागरिकांनी वेळीच तडजोड केल्याने शेतकरी नेत्याने तिथून काढता पाय घेतला.


राजकारणात कवढीची ही किंमत नसलेला हा स्वयंम घोषीत शेतकरी नेत्यांची ओळख सर्वदूर पर्यंत आहे. त्यामुळे हा नौटंकी करण्यात सर्वांत पुढे असतो. एका सामाजिक कार्यकर्त्यांच्या वडिलांचे निधन झाला. त्या ठिकाणी दुःख व्यक्त करण्याऐवजी स्वयंम घोषीत शेतकरी नेत्यांनी नको त्या विषयाला हात घातल्याने उतरत्या वयात 'युवा नगरसेवक तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक' यांच्या अडीच किलोचा हात त्यांच्या कानावर पडल्याने शेतकरी नेत्याला सर्व नातेवाईकांची काही वेळेसाठी आठवण झाल्याची जोरदार चर्चा रंगत आहे.

सदर घटनेची पोलिसात तक्रार न झाल्याने बातमी मध्ये मारणारा आणि मार खाणाऱ्या शेतकरी नेत्याचा नावाचा उल्लेख करण्यात आला नाही.तसही त्या शेतकरी नेत्याला सर्वच नागरिक ओळखतात.

शेतकरी नेत्यांच्या कानाखाली आवाज काढल्याने काही वेळे साठी गोंधळ उडाला होता. मात्र घटनेची माहिती हव्या सारखी पसरल्याने अख्या जिल्ह्यात एकप्रकारे दिवाळीच साजरी केल्या जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता तरी हा स्वयंम घोषीत शेतकरी नेता सुधारणार का अशा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad