Breaking

Post Top Ad

सोमवार, १४ सप्टेंबर, २०२०

'नऊ जणांचा मृत्यू तर १९८ जण नव्याने पॉझिटीव्ह'


 

'नऊ जणांचा मृत्यू तर १९८ जण नव्याने पॉझिटीव्ह'

यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा दिवस दिवसं वाढत चालला आहे. आज दि.१४ सप्टेंबर रोजी चोवीस तासात जिल्ह्यात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून १९८ नव्याने पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. तर वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले १८७ जण 'निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह' झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.


जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असताना बाजारपेठेत गर्दी

सध्या जिल्हात कधी नव्हे एवढी कोरोना ची रूग्णांची संख्या वाढत आहे. त्या दृष्टीने व्यापारी वर्गांनी दि.१५ सप्टेंबर पासून पाच दिवसा साठी बाजार पेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


मृत झालेल्या नऊ जणांमध्ये यवतमाळ शहरातील ५५ वर्षीय पुरुष, यवतमाळ तालुक्यातील ६२ वर्षीय पुरुष आणि यवतमाळ येथील ५६ वर्षीय पुरुष, वणी शहरातील ५३  वर्षीय पुरुष आणि ६० वर्षीय महिला, आर्णी तालुक्यातील ३६ वर्षीय पुरुष, महागाव तालुक्यातील ५७ वर्षीय पुरुष, दारव्हा तालुक्यातील २३ वर्षीय महिला, दिग्रस तालुक्यातील ४३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.   


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत ६२३४५ नमुने पाठविले असून यापैकी ६०७४८ प्राप्त तर १५९७ अप्राप्त आहेत. तसेच ५४८४० नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या १९८ जणांमध्ये  पुरुष ११३ आणि महिला ८५ आहेत. यात यवतमाळ शहरातील १९ पुरुष व १५ महिला, उमरखेड शहरातील ११ पुरुष व  महिला ११,  वणी शहरातील २३ पुरुष व १७ महिला, आर्णी शहरातील तीन पुरुष व आठ महिला, आर्णी तालुक्यातील एक पुरुष, बाभुळगाव शहरातील १६ पुरुष व चार महिला, दारव्हा शहरातील १२ पुरुष व सहा महिला, दिग्रस शहरातील सहा पुरुष व सहा महिला,  दिग्रस तालुक्यातील एक पुरुष, घाटंजी शहरातील चार पुरुष व सहा महिला, कळंब शहरातील एक पुरुष, मारेगाव शहरातील एक पुरुष, नेर शहरातील तीन पुरुष व एक महिला, पांढरकवडा शहरातील दोन पुरुष व तीन महिला,  पुसद शहरातील सात पुरुष व चार महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष, झरी शहरातील दोन पुरूष व चार महिलांचा समावेश आहे.


वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात १२७९ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २७४ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ५९०८ झाली आहे. यापैकी ४१९५ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १५९ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २८८ जण भरती आहे.


ऑक्सीगजन समिती गठीत

जिल्हृयात कोविड-१९ च्या अनुषंगाने रुग्णांच्या उपचाराकरीता पुरेसा ऑक्सीजन पुरवठा उपलब्ध करून वितरण करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी साथरोग प्रतिबंधात्मक कायद्यान्वये पाच सदस्यांची जिल्हास्तरीय समिती गठीत केली आहे.

ही समिती दैनंदिन ऑक्सीजनची गरज व ती पुरविणाऱ्या बॉटलींग प्लँट, बल्क सप्लायर्स यांच्या सतत संपर्कात राहून तसेच विभागस्तरीय समितीशी समन्वय साधून प्रत्येक रुग्णालयात वेळेत ऑक्सीजन प्राप्त होईल याची दक्षता घेणार आहे. तसेच जिल्ह्यात ऑक्सीजनची मागणी नोंदविणे, आवश्यक ठिकाणी ऑक्सीजन पुरवठा करणे, याकरिता जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 07232-240720, 240844, 255077 असा आहे. या समितीचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी हे राहणार असून ते ऑक्सीजन पुरवठा बाबत जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, खाजगी रुग्णालये, सर्व संबंधित विभाग यांच्याशी ऑक्सीजन पुरवठा सुरळीत पुरविण्याकरीता समन्वय साधण्याची कार्यवाही करतील. समितीचे सदस्य म्हणून सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन हे ऑक्सीजन पुरवठा बाबत जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उत्पादकांशी समन्वय साधणे, व बॉटलिंग प्लँटमधून ऑक्सीजन वाटपाचे काम पाहतील.


जिल्हाधिकाऱ्यांची चापर्डा कोविड सेंटर भेट

'नऊ जणांचा मृत्यू तर १९८ जण नव्याने पॉझिटीव्ह'
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता यावर करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी कळंब तालुक्यातील चापर्डा येथील कोव्हीड केअर सेंटरला भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपविभागीय अधिकारी अनिरुध्द बक्षी, जिल्हा शल्य चिकिसक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, कळंबचे तहसीलदार सुभाष जाधव, गटविकास अधिकारी सुशील संसारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विजय अकोलकर,  ठाणेदार विजय राठोड आदी उपस्थित होते.


दरम्यान  यावेळी जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, जास्तीत जास्त नागरिकांच्या चाचण्यांवर भर द्या. पूर्व व्याधींनी ग्रस्त असलेल्या प्रत्येक व्यक्तिची वेळत तपासणी करा. लक्षणे असलेल्या रुग्णाची तात्काळ तपासणी करून वेळेत उपचार उपलब्ध करून द्या. ग्रामस्तरीय समितीमार्फत रोज सर्वेक्षण करावे. सर्वेक्षणातून लक्षणे असलेल्या नागरिकांची माहिती तात्काळ आरोग्य विभागास द्या, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले. यावेळी त्यांनी कोव्हीड-१९ बाबत करण्यात आलेल्या उपाययोजना, प्रतिबंधित क्षेत्रातील तसेच कोव्हीड केअर सेंटरमधील सोयीसुविधा, तपासण्या, संपर्कातील व्यक्तिंचा शोध आदींचा आढावा घेतला. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पांचाळ यांनीसुध्दा ग्रामीण भागातील चाचण्यांवर भर देण्याच्या सुचना केल्या. यावेळी कोव्हीड केअर सेंटरचे प्रमुख डॉ. प्रणय पेंदोर, डॉ. शैलेश चव्हाण, ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. रवी पाटील, कृषी अधिकारी प्रतिभा कुटाळ आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad