यवतमाळ : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या व मृत्युचा आकडा वाढत असला तरी दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत चार हजारांच्या वर कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आज दि.१३ सप्टेंबर रोज रविवार ला येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर तसेच कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेले १७३ जण 'निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह' झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात गत २४ तासात पाच कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून यात २५८ जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत.
जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पाच हजार सातशे नऊ झाली आहे. डॉक्टरांच्या अथक परिश्रमाने यापैकी तब्बल ४००८ रुग्ण बरे झाले असून त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७०:२० टक्के आहे. रविवारी दिवसभरात मृत झालेल्या पाच जणांमध्ये तीन पुरुष व दोन महिला आहेत. यात यवतमाळ शहरातील ७५ वर्षीय पुरुष व ४९ वर्षीय महिला, पांढरकवडा शहरातील ४७ वर्षीय पुरुष, वणी शहरातील ९० वर्षीय महिला आणि दारव्हा शहरातील २४ वर्षीय पुरुष आहे.
नव्याने पॉझिटीव्ह आलेल्या २५८ जणांमध्ये पुरुष १६० व महिला ९८ आहेत. यात आर्णी शहरातील १५ पुरुष व पाच महिला, आर्णी तालुक्यातील एक महिला, दारव्हा शहरातील सात पुरुष व चार महिला, दारव्हा तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील दोन पुरुष व दोन महिला, घाटंजी शहरातील चार पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यातील एक पुरुष, कळंब शहरातील दोन पुरुष व दोन महिला, कळंब तालुक्यातील चार पुरुष, महागाव शहरातील २३ पुरुष व १४ महिला, महागाव तालुक्यातील एक महिला, नेर शहरातील एक पुरुष, नेर तालुक्यातील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील १५ पुरुष व चार महिला, पुसद शहरातील २० पुरुष व १४ महिला, राळेगाव शहरातील एक पुरुष व आठ महिला, उमरखेड शहरातील पाच पुरुष व दोन महिला, वणी शहरातील २० पुरुष व २० महिला, वणी तालुक्यातील एक पुरुष, यवतमाळ शहरातील २६ पुरुष व १४ महिला, यवतमाळ तालुक्यातील एक पुरुष, झरी शहरातील आठ पुरुष व पाच महिला, तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणचे दोन पुरुष व एका महिलेचा समावेश आहे.
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यात १२७६ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २७४ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ५७०९ झाली आहे. यापैकी ४००८ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात १५० मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात २९३ जण भरती आहे.