ढाणकी पासून जवळ असलेल्या खरुस रोड वरील संजय जिल्लावार यांच्या शेतात काल दिनांक २९ ऑगस्ट रोजी रात्री ८ च्या सुमारास अंदाजे दहा ते पंधरा जणांच्या टोळीने दरोड्या च्या उद्देशाने येवून सालगड्याला बांधून महिलेच्या अंगावरील दागिने लुटल्याची घटना शनिवारी रात्री दरम्यान घडली.
दहा ते पंधरा जण शेतात असल्या नंतर सालगडी तेव्हा जेवणाच्या तयारीत होते. घरात प्रवेश करून त्यांनी "सोने कोठे आहे, सांग नाहीतर मारून टाकतो " असे म्हणून चाकूचा धाक दाखवून मारहाण केली व प्राणघातक हल्ला करण्यात आला.
शेतगडी नामे नागोराव वामन डहाके वय २८ वर्ष हा मागील काही दिवसा पासून संजय जिल्लावार यांच्या शेतात रोज मंजुरीने आपल्या परिवारा सह मुक्कामी काम करतो. तो कुटुंबासह जेवण करण्यास बसला असता दहा ते पंधरा अज्ञात चाकू घेऊन, व धाक दाखवून सोन्याची विचारणा केली व माहिती न सांगल्या मुळे गड्या वर चाकूने पायावर, डोक्यावर, मांडीवर सपासप वार केले. तसेच दुसरा गडी प्रतिकार करत असल्याने त्या गड्या ला विहरीत फेकून दिले.
मात्र त्याला पोहता येत असल्याने त्याचा जीव वाचला. फिर्यादी नागोराव डहाके यांच्या व त्यांच्या सोबत च्या पत्नी कडून दोन मंगलसूत्र व कानातील फुल असा एकूण वीस हजार रुपयाचा मुद्देमाल घेऊन दरोडेखोर पळून गेले. शेतात एका खोलीत कडबा होता तो सुद्दा बाहेर काढला. मात्र त्यांना काहीही मिळाले नाही.अंदाजे दहा च्या सुमारास शेत मालक संजय जिल्लावार हे शेतात आल्या नंतर त्यांना ही घटना कळली. त्यांनी तात्काळ बिटरगाव पोलीस स्टेशनं ला ही माहिती दिली. माहिती मिळतात ठाणेदार विजय चव्हाण व उपनिरीक्षक रामकिसन जायभाये यांनी घटना स्थळ गाठले व व आज सकाळी श्वान पथकाला बोलवण्यात आले.पोलीस स्टेशनं बिटरगांव येथे आज दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 7 वाजता गुन्हा नोंद करण्यात आला. अज्ञात आरोपींवर ३९५, ३०७, ३२३, ५०६ भा.दं. वि. या कलमानुसार गुन्हा नोंद करण्यात आला.पुढील तपास उमरखेड पोलीस उपविभागीय अधिकारी मुक्तार बागवान यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार विजय चव्हाण, उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, रवी गिते, गजानन खरात, संदीप राठोड, सतीश चव्हाण, शेळके, निलेश भालेराव हे करत आहेत.

