Breaking

Post Top Ad

रविवार, ३० ऑगस्ट, २०२०

'रविवारी १२१ जण पॉझिटीव्ह तर २३६ जणांनी केली कोरोनावर मात'

'रविवारी १२१ जण पॉझिटीव्ह तर २३६ जणांनी केली कोरोनावर मात'

यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड व विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले २३६  जणांनी कोरोनावर मात करून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच रविवारी जिल्ह्यात तीन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून १२१ जण नवीन पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने रविवारी २३४ नमुने तपासणीकरीता पाठविले. सुरवातीपासून आतापर्यंत ४८५२८ नमुने पाठविले असून यापैकी  ४६२५७ प्राप्त तर २२७१ अप्राप्त आहेत. तसेच ४२९७१ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे. 

मृत झालेल्यांमध्ये यवतमाळ शहरातील वयोवृद्ध वर्षीय महिला, ५५ वर्षीय पुरुष आणि यवतमाळ तालुक्यातील ५५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या १२१ जणांमध्ये  पुरुष ७८ व  महिला ४३ आहेत. यात यवतमाळ शहरातील २५ पुरुष व २२ महिला, महागाव शहरातील एक पुरुष व एक महिला, झरी तालुक्यातील एक पुरुष, दिग्रस शहरातील आठ पुरुष व दोन महिला, उमरखेड शहरातील सहा पुरुष व एक महिला, नेर शहरातील दोन पुरुष व तीन महिला, नेर तालुक्यातील एक पुरुष, वणी शहरातील १७ पुरुष व तीन महिला, कळंब शहरात १० पुरुष व आठ महिला, बाभुळगावमध्ये दोन पुरुष व एक महिला, घाटंजी तालुक्यात एक पुरुष व एक महिला, पुसद शहरात दोन पुरुष व पुसद तालुक्यात एक पुरुष, पांढरकवडा शहरात एक महिला, दारव्हा शहरात एक पुरुष पॉझेटिव्ह आले आहेत.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ४९७ ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह भरती असून होम आयसोलेशनमध्ये २४५ जण आहेत. सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 3286 झाली आहे. यापैकी २४६२ जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात ८२ मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात १७४ जण भरती आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad