नेहमी या-ना त्या कारणाने चर्चेत राहणारे आणि शिष्टाचार बासणात गुंडाळून प्रशासनाला वेठीस धरणारा वादग्रस्त शेतकरी नेता जिल्हा माहिती अधिकारी कधी झाला अशी चर्चा सध्या सोशल मिडीयावर सुरू आहे.
उगवता सुर्याला सलाम करणारे हा स्वयंम घोषीत नेता सध्या राज्याच्या एका मिशनची धुरा त्यांच्या खांद्यावर असताना केवळ यवतमाळ ते पांढरकवडा आणि पांढरकवडा ते यवतमाळ अशा त्यांचा दौरा नेहमी व्हाॅट्सअप वर व्हायरल केल्या जाते. त्यामुळे ह्या स्वयंम घोषीत शेतकरी नेता सध्या जिल्ह्यात विनोदाचा विषय बनला आहे.
प्रशासनाला कोणतीही माहिती देखील नसतांना हा पट्या मुख्यमंत्री यांच्या नावाचा वापर करून स्थानिक प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेठीस धरत असल्याने अधिकारी वर्गातून प्रचंड नाराज व्यक्त केल्या जात आहे. सततची नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली येवून आत्महत्या करणाऱ्या शोषित पिडीत शेतकऱ्यांच्या दुःखावर फुंकर घालण्या एवजी चमको"गिरी" करित असल्याने जिल्हा प्रशासनान आणि शेतकरी वर्तुळातून त्या वादग्रस्त आणि नौटंकीबाज नेत्या बदल प्रचंड असंतोष खदखदत आहे.
जिल्हात शिवसेना खत्म करणार......
भाजप मधून कोंलाडी मारून अलीकडेच शिवसेनेत आलेल्या वयोवृद्ध स्वयंम घोषीत नेता जिल्हातील शिवसेनेची वाट लावल्या नंतरच गप्प बसणार असल्याची माहिती आहे.त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप मधून आलेली पार्सल ची योग्य रित्या पाहणी करून बाहेरचा रास्ता दाखवावा अशी मागणी निष्ठावंत शिवसैनिकांमधून होत आहे.
शेतकऱ्यांशी निगडीत आंदोलनाचा मार्ग वापरून प्रशासनाचे वाभाडे काढणारा वादग्रस्त 'स्वयंम घोषीत शेतकरी नेता' सध्या विनोदाचा विषय बनला आहे. विशेष म्हणजे हा नेता मुख्यमंत्री, आरोग्य संचालक, यांच्या सोबत कधी बोलले याचा पुरावा त्यांनी सोशल मिडीया वर सादर करण्याची मागणी होत आहे. मोबाईल वर बोट हलवून मोबाईल च्या 'टि' बोर्डावरून स्वतःच दौऱ्याची माहिती देण्याचे काम तो नेता करतोय.
राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या व्यक्ती जिल्ह्यात येण्या आधी दोन ते तीन दिवसा पुर्वी दौराची माहिती अथवा पुर्व कल्पना स्थानिक प्रशासनाला देणे बंधनकारक असते. मात्र ह्या नेत्याचा दौरा संदर्भात माहिती कोणत्याच वृत्तपत्रातून प्रसिद्ध झालेली नसते. त्यामुळे हा नौटंकी पणा कशासाठी अशा सवाल या निमित्ताने चर्चेला जात आहे.
कोट घालून आभाळा एवढ्या उंचीच्या लोक नेत्याला एकेरी भाषेत उल्लेख करण्याची खुमखुमी या वादग्रस्त आणि नौटंकीबाज नेत्याजवळ येते कुठुन हा संशोधनाचा विषय ठरत आहे. ज्या सरकार च्या जोरावर पद भोगत आहेत.त्याच सरकारचे कपडे फाडण्याची काम ह्या नेत्या कडून सातत्याने होत आहे. एकाचे लुगडे दुसऱ्यांचे कुंकू अन् कुठेच नांदली नाही, लाडाची रिंकू हि म्हण भाजप मधून शिवसेनेत आलेल्या एका स्वयंम घोषीत शेतकरी नेत्याला तंतोतंत लागू होते.
