कन्हान, पेंच, कोलार, जाम, वर्धा, वैनगंगा नदीला पूर
शुक्रवार आणि शनिवार सलग दोन दिवस संततधार झालेल्या अतिवृष्टी मुळे नागपुर व भंडारा जिल्हातील अनेक गावांना पुराचा फटका बसल्याने करोडो रूपयाचा नुकसान झाला. नागपुर जिल्हातील मौदा शहर सह तीस गावांना कन्हान नदीच्या पुराने वेढा घातला आहे. त्यामुळे दोन्ही जिल्हात हाहाकार माजला आहे.
नागपुर-भंडारा मार्गावर अडकलेले वाहन
पेंच प्रकल्पाचे एकुण १६ दरवाजे उघडल्याने मौदा शहरासह परिसरातील तीस गावांना कन्हान नदीच्या पुराने वेढा घातला आहे. तब्बल २६ वर्षानंतर म्हणजे १९९४ नंतर पहिल्यांदाच एवढा मोठा पुर आल्याने मौदा शहरातील प्रसिद्ध च्रकरधर महाराजांचा मंदिर सह अनेक घरात पुराचे पाणी शिरले आहे.
कन्हान नदीच्या कवेत मौदा शहर
नागपुर आणि भंडारा जिल्ह्याला लागुन चौराही, पेंच आणि तोतलाडोह असे मोठे धरण आहे. सलग दोन दिवस पडलेल्या संततधार पावसामुळे तिन्ही प्रकल्पाचे पाणी कन्हान नदी आणि वैनगंगा नदीत सोडण्यात आल्याने पूर पुरप्रस्तिथी निर्माण झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.कन्हान आणि वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने दोन्ही बाजुची वाहतूक पुर्ण पणे खोळंबली असल्याने लांब लचक वाहनांच्या रांगा लागल्या आहे.


