Breaking

Post Top Ad

सोमवार, १० ऑगस्ट, २०२०

'शेतकरी नेत्यांचा भर चौकात गारूड्याचा खेळ'

'शेतकरी नेत्यांचा भर चौकात गारूड्याचा खेळ'
यवतमाळ - पांढरकवडा येथे कोरोना रूगांचा आकडा दिवसं दिवस वाढतच चालला आहे. अशात कोरोनावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने शहरातील विविध परिसर प्रशासनाने सील केले आहे. मात्र सील केलेला भाग पुर्वरत  खुला करण्याच्या मागणी साठी विरोधी पक्षा ऐवजी सत्तेतील नेत्यांनीच आंदोलन केल्याने सरकार वर विरोधी पक्षातील नेत्यांना टिका करण्याची  आयती संधी मिळाल्याची चर्चा या निमित्ताने सुरू आहे.

सरकार मध्ये राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या वसंतराव नाईक स्वालंबन मिशनच्या अध्यक्षपदाची लाज न बाळगतात, सरकारचे कपडे फाडण्याचा प्रकार स्वयंम घोषीत शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी पांढरकवड्यातील भर चौकात गारूड्याचा खेळ दाखवल्याने ते जिल्ह्यात विनोदाचा विषय बनला आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर साडी,माडी,गाडी कमावणारे हे भुरटे नेते पंचक्रोषीतील शेतकरी नेते दुबार,तिबार पेरणीमुळे आणि युरिया खत न मिळत नसल्याने तिवारांनी शेतकऱ्यांचा जखमेवर मलम लावण्या एवजी मिठ चोळून गारूड्याचा खेळ केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मिशनच्या अध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी नौटंकीबाज  नेत्याला पदावरून हटवण्याची मागणी
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्या एवजी कायम सरकारच्या विरोधात काम करणारे किशोर तिवारी यांना राज्यमंत्री पदाच्या दर्जा असलेल्या वसंतराव नाईक स्वालंभन मिशनच्या अध्यक्षपदा वरून हटवण्याची मागणी जिल्हातील महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये सुरू आहे.
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची टिम जीवाचे रान करून कोरोना आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करित आहे. दुसरी कडे मात्र भाजप मधून कोंलाडी मारून शिवसेनेत गेलेले वादग्रस्त नेते तथा वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी सरकारच्या धोराना विरोधात जावून यवतमाळ जिल्हातील पांढरकवडा येथे सोमवारी दुपारी बारा वाजता पासून भर रस्त्यावर आंदोलन सुरू केल्याने प्रशासकीय यंत्रणेची डोकेदुःखी वाढली होती. किशोर तिवारी हे नौटंकी करण्यात अग्रेसर असल्याची चर्चा या निमित्ताने शहरात सुरू आहे. महामारी च्या संकटात शासन आणि प्रशासनाला सहकार्य करण्या एवजी केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी भर रस्त्यावर सील केलेला भाग पुर्वरत खुला करण्याच्या मागणी साठी तिवारी यांनी आंदोलन सुरू केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad