देवानंद जाधव - ९८ ८१ १३९ १२६
यवतमाळ तालुक्यातील हिवरी येथील गुणवंत सानिका सुधाकर पवार या हिरकणी ने बापाची तिरडी अंगनात बांधत असतानाच, त्याच दिवशी तिचा संस्कृत विषयाचा पेपर होता. ईकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशाही निराशेच्या गर्तेत असतांना, तिने आईच्या साडीच्या पदराने डबडबले डोळे पुसत परीक्षा केंद्राची वाट धरली होती, नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परिक्षेत तिला पैकी च्या पैकी मार्क मिळाले. शिवाय अन्य विषयात ९८ टक्के गुण मिळवत अव्वल आली.
या संदर्भात मी विविध माध्यमातून सानिका ची व्यथा आणि यश जगासमोर आणले. "बापाची तिरडी अंगनात अन् लेक गेली परिक्षा केंद्रात. या मथळ्याखाली बातमी प्रकाशित होताच ती प्रकाशझोतात आली. याचीच दखल घेत विधानसभा अध्यक्ष मा नाना साहेब पटोले यांनी थेट विधानभवनातुन दूरध्वनी द्वारे संपर्क करुन सानिकाचे अभिनंदन करुन कौतुकाची थाप मारली होती. अन् पुढील शिक्षणासाठी तजविज करुन देईन असा शब्द दिला. 
याशिवाय मुंबई येथील वडार समाजाचे ह्रदयसम्राट विजय दादा चौगुले यांनीही दखल घेतली. त्यांनी सानिका च्या बॅंक खात्यावर एक लाख रुपये आर.टी.जी.एस. व्दारे टाकुन मोलाची मदत केली. सानिकाने पसंतीच्या श्रेञात आणि शहरात शिक्षण घ्यावे, तिची संपुर्ण जबाबदारी मी घेत असल्याचे विजय दादा चौगुले यांनी सांगितले. मदतीसाठी मि वडार महाराष्ट्राचा संघटनेचे यवतमाळ पदाधिकारी प्रभाकर देवकर यानी पाठपुरावा केला. सानिका सुधाकर पवार आणि परिवाराने दादांचे आभार मानले आहे. 
