जगातील ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान अगदी हतबल झाल्याचे सध्यातरी दिसून येत आहे. जर्मनी, इटली, स्पेन, पोलंड, फ्रान्स, नेदरलॅंड, स्वीडन आणि भारत यासह अन्य देश कोरोना मुळे चिंताग्रस्त आहे. देशातील निरपराध जनता कोरोनाग्रस्त झाली आहे. कोरोना मुळे अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, इटली या सारखे वैद्यकीय क्षेत्रात अग्रणण्य असलेल्या विकसीत देशाचेही डोळे पांढरे झाले आहे. विकसीत देशाच्या तुलनेत आपला देश खूप मागे आहे.
वर्दळीने भरलेल्या चौकात पडला ओस
यवतमाळ शहरातील रोज प्रचंड वर्दळ असणारे चौक बस स्थानक चौक, कळंब चौक, मेन लाईन चौक, लोहारा चौक, स्टेट बॅक चौक, वडगाव नाका या चौकात शनिवारी लाॅकडाऊन मुळे सामसूम असल्याचे दिसून आले.
गेल्या काही दिवसा पासून कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शनिवारी २५ ते ३१ जुलै पर्यंत शहरात लाॅकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे शहरातील रस्ते पुर्ण पणे सामसूम दिसून येत होते.
यवतमाळ सह तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्येत दररोज वाढत होत आहे. अशा प्रस्थितीत कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यवतमाळ शहर दि.२५ ते ३१ जुलै पर्यंत संचार बंदी केली आहे. दरम्यान गुरूवार, शुक्रवार कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने शनिवार पासून संचार बंदी लागु केली.
कोरोना वर सध्याच्या घडीला एकच उपाय म्हणजे कोणतेही विध्वंसक साहित्य न वापराता केवळ आप आपल्या घरी बसून कोरोनाच्या विरूद्ध युद्ध छेडण्याचा संदेश देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. मात्र नागरिक किती दिसून चार भींतीच्या आत राहील याला सुध्दा काही मर्यादा आहे.
जिल्हातील कोरोना रूग्णांची संख्या शुक्रवार पर्यंत एकुण ७०८ एवढी झाली होती. त्या पैकी ४५१ लोकांनी कोरोना वर मात करून बरे झाले. सध्या च्या घडीला कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या २३४ आहे. यामध्ये उपचारा दरम्यान आता पर्यंत २३ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. कोरोना रूग्णांची साखळी तोडण्याच्या दृष्टीने यवतमाळ सह पुसद, दिग्रस, पांढरकवडा आदी ठिकाणी लाॅकडाऊन सुरू आहे.
