मुंबईतील धारावीत कोरोना वर नियंत्रण मिळवणे एवढे सोपे काम नव्हते, मात्र मुंबई महानगरपालिका आणि प्रशासन, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग मुळे एकात्मिक प्रयत्नांचे फलित म्हणुन धारावीतील कोरोना साथरोग नियंत्रणाच्या यशाकडे गेले. कोरोना वर नियंत्रण मिळवणे स्थानिक लोकांचा सहभागा मुळे शक्य झाले असून या ठिकाणी चाचण्या करणे, रूग्णांचा शोध घेणे आणि स्वंयशिस्तीचे काटेकोरपणे पालन या कडे योग्य रित्या लक्ष दिल्याने धारावीतील कोरोनाची साखळी तोडता आली. धारावी वर उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे बारीक लक्ष ठेवत असल्याचे बोलल्या जात आहे.
आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी आणि दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या धारावीने स्वयंघोषित आणि सामूहिक प्रयत्नातून कोरोना सारख्या महामारी संकटावर नियंत्रणात ठेवता येते हे जगाला दाखवून दिले. कोरोना विरूद्ध लढ्यातील रोल मॉडेल म्हणून जागतिक स्तरावर आपलं नाव नोंदवलं, अशा शब्दात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
मुंबईतील धारावी ही आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखले जाते. कोरोना साथ रोगावर नियंत्रण मिळवल्याने मुख्यमंत्र्यांनी धारावी करांना शाबासकी दिली आहे. विशेष म्हणजे धारावीत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने जागतिक आरोग्य संघटना कडून त्याची दखल घेत धारावीची सर्वत्र वाहवा होत आहे. एवढ्या मोठ्या दाट झोपडपट्टीत आज रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यांवर आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्या फार कमी आहे.
या स्वयंशिस्तीची आणि एकात्मिक प्रयत्नांची दखल जागतिक आरोग्य संघटनेने घेतली. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अडहॅनम गेब्रेसुस यांनी ज्या देशांनी कोरोना वर नियंत्रणात उत्तम कामगिरी केली त्याची उदाहरणे देताना धारावीतील एकात्मिक प्रयत्नांचा आवर्जून उल्लेख केला. कोरोना सारख्या महामारी च्या परिस्थितीत अशी उदाहरणे आपल्याला साथीच्या प्रादुर्भावातून बाहेर पाडण्यासाठी प्रेरणा देऊ शकतात, अशा शब्दात त्यांनी कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले. दरम्यान कोरोना नियंत्रणात ठेवणाऱ्या धारावी करांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शाबासकीची थाप देत कौतुक केले आहे.
