टीम इंडियाचा १० महिन्यांचा वनडे रोडमॅप; ६ मालिकांत २० सामने, शुबमन गिल नेतृत्वात तयारी!

 

 टीम इंडियाच्या १० महिन्यांच्या वनडे वेळापत्रकाची घोषणा; ६ मालिकांत २० सामने, वर्ल्ड कपपूर्व मोठी तयारी

 मुंबई : बीसीसीआय म्हणजे Board of Control for Cricket in Indiaने टीम इंडियाच्या आगामी एकदिवसीय मालिकांचे वेळापत्रक जाहीर केले असून पुढील १० महिन्यांत संघ ६ वेगवेगळ्या प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध एकूण २० सामने खेळणार आहे. शुबमन गिल यांच्या नेतृत्वाखाली संघ २०२७ च्या वनडे विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर तयारी मजबूत करण्यावर भर देणार आहे. या मालिकांमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा यांसारखे अनुभवी खेळाडूही मैदानात दिसणार आहेत.

आयपीएलच्या १९व्या हंगामानंतर टीम इंडियाचा आंतरराष्ट्रीय दौरा सुरू होणार असून पहिली एकदिवसीय मालिका Afghanistan national cricket team विरुद्ध खेळवली जाणार आहे. ही मालिका जून महिन्यात भारतात होणार असून १४ जून रोजी धर्मशाला, १७ जून रोजी लखनौ आणि २० जून रोजी चेन्नई येथे सामने होणार आहेत. या दोन संघांमधील ही पहिलीच वनडे मालिका ठरणार आहे.

यानंतर टीम इंडिया युके दौऱ्यावर जाऊन  इंग्लंडच्या टीम विरुद्ध तीन सामन्यांची मालिका खेळणार आहे. १४ जुलै रोजी बर्मिंघम, १६ जुलै रोजी कार्डीफ आणि १९ जुलै रोजी लॉर्ड्स येथे सामने होणार आहेत.

सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात  वेस्टइंडीज क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार असून तीन सामन्यांची मालिका २७ सप्टेंबर (तिरुवनंतपुरम), ३० सप्टेंबर (गुवाहाटी) आणि ३ ऑक्टोबर (न्यू चंदीगड) येथे खेळवली जाणार आहे.

यानंतर नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान न्युझीलँड विरुद्ध पाच सामन्यांची मोठी मालिका आयोजित करण्यात आली आहे. या मालिकेचे तपशीलवार वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नसले तरी ही मालिका तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे.

डिसेंबर महिन्यात  श्रीलंका टीम भारत दौऱ्यावर येणार असून १३ डिसेंबर (दिल्ली), १६ डिसेंबर (बंगळुरू) आणि १९ डिसेंबर (अहमदाबाद) येथे तीन सामने खेळवले जातील.

नववर्षाच्या सुरुवातीला जानेवारी २०२७ मध्ये  झिम्बावे विरुद्ध तीन सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे. ३ जानेवारी (कोलकाता), ६ जानेवारी (तिरुवनंतपुरम) आणि ९ जानेवारी (मुंबई) येथे हे सामने होणार आहेत.

या सर्व मालिकांमधून टीम इंडिया एकूण २० एकदिवसीय सामने खेळणार असून २०२७ वनडे विश्वचषकासाठी संघाची बांधणी आणि संयोजन निश्चित करण्यासाठी ही मालिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विविध परिस्थितींमध्ये खेळण्याचा अनुभव मिळवून संघ अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न या वेळापत्रकातून स्पष्ट दिसत आहे.

----------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने