Miss Universe 2025 स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करणारी मनिका विश्वकर्मा सध्या थायलंडमध्ये सुरु असलेल्या या जगप्रसिद्ध सौंदर्यस्पर्धेत जबरदस्त चमक दाखवत आहे. सुमारे 100 देशांच्या स्पर्धकांमध्ये अनेकांनी मध्यंतरात माघार घेतली असली तरी मनिका मात्र सर्वात बलाढ्य दावेदार म्हणून पुढे आली आहे. सोशल मीडियावर तिच्या लूक्सची जोरदार चर्चा आहे आणि स्पर्धेत सहभागी असलेल्या इतर देशांच्या स्पर्धकांनीही तिच्या सौंदर्याबरोबरच भारतीय पोशाख, शालीनता आणि संस्कृतीचे केलेल्या सादरीकरणाचे कौतुक केले आहे.
थायलंडमधील विविध इव्हेंट्सदरम्यान मनिकाने केवळ वेस्टर्न गाउन किंवा आधुनिक ड्रेसेसचीच निवड न करता भारतीय लहंगा, साडी, अनारकली अशा पारंपरिक पोशाखांमध्येही स्वतःला सादर केले. गुलाबी आणि बीच रंगांच्या मोत्यांनी सजवलेल्या लहंग्यातील तिच्या एका व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा लहंगा मनिकाने अतिशय आकर्षक पद्धतीने कॅरी केला असून तिच्या चालण्यापासून ते एकूणच लूकपर्यंत सर्वच गोष्टींनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले
भारताहून थायलंडला रवाना होताना विमानतळावर घेतलेल्या तिच्या साडीतील फोटोंनीही इंटरनेटवर खळबळ उडवली. लाल रंगाच्या ऑर्गेन्झा कपड्याची साडी, त्यावरचे नाजूक गोल्डन एम्ब्रॉयडरी व सीक्विन वर्क, आणि त्यासोबत डोक्यावरचा ताज तिचा हा देसी-रॉयल लूक सर्वांनाच भुरळ घालणारा ठरला. वी-नेक ब्लाउजवरील नक्षीकाम देखील या लूकला अधिक उठावदार बनवत होते.
याशिवाय मनिकाचा फूलांच्या डिझाईनचा कोऑर्ड सेट, ज्यामध्ये स्लीवलेस ब्लाउज, जॅकेट आणि पॅन्ट्सचा समावेश होता, हा देखील विशेष चर्चेत राहिला. या पोशाखावर केलेले मोत्यांचे कलाकुसर, ब्लाउज आणि जॅकेटवरील लटकन, तसेच मोत्यांचे चोकर व ईअररिंग्ज यांनी तिच्या व्यक्तिमत्त्वाला एक वेगळाच ग्लॅमर दिला. या लूकमध्ये तिने केलेला स्लीक बन, शिमरी आयशॅडो, काजल, मस्कारा, ग्लॉसी लिपस्टिक आणि परफेक्ट मेकअपने तिचा स्टाइल स्टेटमेंट एक पायरी वर नेला.
बँकॉकमध्ये झालेल्या इतर इव्हेंटमध्ये मनिका अनारकली कुर्ता सेटमध्येही झळकली. गोल्डन वर्क, सीक्विन डिटेलिंग आणि कढाईदार दुपट्ट्याने सजलेला हा पोशाख तिला अत्यंत लावण्यवती दिसवत होता. मिस इंडोनेशियासह इतर देशांच्या स्पर्धकांसोबत घेतलेल्या तिच्या छायाचित्रांनीही सोशल मीडियावर मोठी दाद मिळवली.
थायलंडमधील Miss Universe 2025 स्पर्धेत भारतीय संस्कृती, कलेची ओळख आणि पोशाखांची भव्यता जगासमोर प्रखरपणे मांडत असलेली मनिका विश्वकर्मा केवळ भारताची नव्हे तर जागतिक स्तरावरील एक प्रभावी दावेदार म्हणून समोर आली आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
