इम्रान खानच्या मृत्यूच्या दाव्यांमुळे अफवांना खतपाणी !

 


अधिकृत वृत्तसमोर आल्यामुळे कुटुंब, समर्थक संतापले

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इमरान खान यांच्या ‘मृत्यू’ किंवा ‘कत्ल’ झाल्याच्या अफवा जोर धरत आहेत. अदियाला जेलमध्ये त्यांना विष देऊन मारले, तुरुंगात असताना कोणत्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला असावा किंवा खूप त्यांना दुसऱ्या जेलमध्ये लपवून ठेवले आहे या तीन शक्यतांचा कयास लावला जात आहे. या सगळ्या दाव्यांपुढे पाकिस्तान सरकार, जेल प्रशासन आणि सैन्य यांनी अजून कोणतीही पुष्टी किंवा स्पष्ट वक्तव्य दिलेले नाही. त्यामुळे सध्याची स्थिती अफवा व सामाजिक तणाव वाढलेला आहे, पण सत्य काय हे काहीच समोर आलेले नाही.

त्याचबरोबर, त्यांच्या तीनही बहिणींनी नूरीन खान, आलीमा खान आणि उज़्मा खान ज्या ‘भेटी’ची मागणी करत होत्या, त्यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर हिंसाचार केल्याचा आरोप केला आहे. या घटनेनंतर त्यांच्या समर्थकांचा गोंधळ वाढला असून तुरुंगाबाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले.

मात्र, सर्वांत महत्त्वाचे आतापर्यंत कोणत्याही स्वतंत्र, विश्वासार्ह माध्यमाने किंवा अधिकृत स्रोताने इमरान खान यांच्या मृत्यूची निश्चित माहिती दिलेली नाही. त्यामुळे ही सर्व चर्चा, अंदाज आणि अफवा आहेत.


-------------------------------------------------------------------------



Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने