‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पडद्यामागे मोठ्या हालचाली?
इस्लामाबाद / नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारताने पाकिस्तानला धूळ चारल्याचे चित्र जगभर झळकले असतानाच पाकिस्तान आक्रमक भूमिकेत आला आहे. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारताला थेट युद्धाची धमकी दिल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळ उडाली आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर भारताने राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर या लष्करी मोहिमेत पाकिस्तानला मोठे नुकसान झाले होते. या कारवाईनंतर पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला. तरीदेखील पाकिस्तानचा हेकेखोरपणा संपलेला नाही.
पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत वादग्रस्त विधान करत भारताला थेट धमकी दिली. ते म्हणाले भारत हा कधीच एकसंध देश नव्हता. औरंगजेबाच्या काळाव्यतिरिक्त त्या देशात कधी एकात्मता नव्हती. आमच्यात आणि भारतात युद्ध होऊ शकते.
तसे झाले, तर यावेळी परिणाम वेगळे दिसतील. त्यांनी पुढे म्हटले की, “अल्लाहच्या कृपेने आमच्यात युद्ध होऊ नये, पण शक्यता नाकारता येत नाही.”
काही दिवसांपूर्वी भारतीय लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पाकिस्तानला कडक इशारा दिला होता. जगाच्या नकाशावर टिकायचे असेल, तर पाकिस्तानने दहशतवादाचे समर्थन थांबवावे.”
या इशाऱ्यानंतर आता पाकिस्तानकडून आलेली ही धमकी अधिकच गंभीर मानली जात आहे. भारत सरकार या वक्तव्याकडे कसे पाहते आणि राजकीय स्तरावर काय प्रतिक्रिया देते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
ही पहिली वेळ नाही. काही आठवड्यांपूर्वीही आसिफ यांनी ऑपरेशन सिंदूरनंतर भारताविरुद्ध विषारी वक्तव्य केले होते. त्यांनी म्हटले होते की, “भारतातील जनमत आता सरकारच्या विरोधात गेले आहे, आणि भारतीय सरकारने विश्वासार्हता गमावली आहे.”
आता पुन्हा युद्धाची भाषा करत आसिफ यांनी वातावरण तापवलं आहे.
या घडामोडीनंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाच्या काठावर आले आहेत. आंतरराष्ट्रीय समुदायाने संयम राखण्याचं आवाहन केलं आहे. मात्र तज्ज्ञांचे मत आहे की, “पाकिस्तानची धमकी ही राजकीय दबावातून केलेली असली, तरी तिचं परिणामकारक परिणाम जगावर होऊ शकतात.”
#IndiaPakistanTension #KhawajaAsif #OperationSindoor #WarThreat #ModiGovernment #BreakingNews #WorldPolitics #PakistanDefense
