मध्यंतरी पोहरादेवी येथील महंतानी आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी थेट बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीस्थळी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मात्र आमदार संजय राठोड यांनी सर्व महंत आणि समाज बांधवाना आंदोलन न करण्याचे आवाहन केले होते.मात्र येत्या ३१ जून रोजी आमदार संजय राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त यवतमाळमध्ये राज्यभरातील बंजारा समाज बांधव शक्ती प्रदर्शन करण्याची दाट शक्यता आहे.
आमदार संजय राठोड हे राज्यमंत्री नंतर थेट ठाकरे सरकार मध्ये कॅबिनेट मंत्रीपदीवर्णी लागल्यानंतर राठोड यांनी पोहरादेवीचा चेहरा मोहरा बदलविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.मात्र भाजप ने केलेल्या खोट्या आरोपामुळे आमदार संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळे नंगारा भवनाचे काम कासवगतीने सुरू आहे.मंत्री पद गेल्यानंतर ही आमदार संजय राठोड यांनी पाठपुरवा सुरूच ठेवला आहे.

