महाराष्ट्र24 । यवतमाळ : राज्याचे माजी वनमंत्री तथा शिवसेनेचे विद्यमान 'आमदार संजय राठोड' यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यापासून त्यांनी राज्यभरातील 'बंजारा समाजा'च्या व्यवस्था जाणून घेतल्या. तद्नंतर जास्त वेळ मतदारसंघात लक्ष घालून नागरिकाच्या समस्या सोडविण्यात आमदार राठोड सध्या व्यस्थ आहेत.आलीकडेच पोहरादेवी येथील महंतानी "आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीमंडळात घ्या,अन्यथा आम्ही स्व.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या समाधीस्थळी आमरण उपोषण करण्याचा इशारा राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना दिल्यानंतर" समाजातून खऱ्या अर्थाने चळवळ सुरू झाली.
राज्यातील बंजारा समाजाचं नेतृत्व राठोड यांनी करावं
बंजारा समाजाचं नेतृत्व आमदार संजय राठोड यांनी करावं राज्यात ते बारा ते पंधरा आमदार बंजारा समाजाचे विधान सभेवर निवडून सहज आणतील असं समाजातील काही जेष्ठ विचारवंतांना वाटत.
समाजात सर्वच स्तरातून आमदार संजय राठोडांना पाठींबा मिळाल्याचे खुद आमदार संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन महंत आणि समाज बांधवांना आव्हान करावा लागला.तद्नंतर महंतानी आंदोलनाची भूमिका मागे घेतली.मात्र येत्या ३० जून रोजी यवतमाळ शहरात मोठा जनसागर उसळणार असल्याची माहिती आहे.त्या मागचे कारण असे की,मंत्री पद गेल्यानंतरही आमदार संजय राठोड यांच्या लोकप्रियता कमी झालेली नाही.उलट लोकप्रियतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.बंजारा समाजात आमदार संजय राठोड यांची 'मास लिडर' म्हणून ओळख आहेत.विदर्भात देखील आमदार संजय राठोड आजही शिवसेनेत क्रमांक एक वरच आहे.
आमदार राठोडांसाठी उसळणार जनसागर
राज्याचे माजी वनमंत्री आणि शिवसेनेचे विद्यमान आमदार संजय राठोड यांचा येत्या ३० जून रोजी वाढदिवस आहे.त्याअनुषंगाने राज्यभरातून आमदार संजय राठोडांना शुभेच्छा देण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळणार आहे.एक प्रकारे यवतमाळमध्ये बंजारा समाज शक्ती प्रदर्शन करणार असल्याची माहिती आहे.
बंजारा समाजातून 'भाजपा' बाबत नाराजी आहे.बंजारा समाजाचा एकमेव मंत्री म्हणून राज्याच्या मंत्रीमंडळात आमदार संजय राठोड होते.सलग महिन्याभर भाजपा नेत्यांनी आरोपाचे रान उठवल्यानंतर संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला.विशेष म्हणजे राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर ही त्यांचा राजीनामा घेतला नाही.न्यायालायाने सरकारला फटकारल्यानंतर देशमुखांचा राजीनामा घेतल्या गेला.राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री 'नवाब मलीकांना' इडीने अटक केल्यानंतर ही दररोज नविन-नविन प्रकरण बाहेर येत आहेत.मात्र त्यांचा अद्यापही राजीनामा घेतल्या गेला नाही.आमदार संजय राठोडांवर नुसतं भाजपाने आरोप केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष 'शरद पवारां'नी नाराजी व्यक्त केली.त्यानंतर खऱ्या अर्थाने संजय राठोड यांचा राजीनामा बाबत मुख्यमंत्र्यांवर दबाव आला आणि आमदार संजय राठोडांना राजीनामा द्यावा लागला.
