Breaking

Post Top Ad

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

पारवा ठाणेदारांनी विजय कडे केलाय दुर्लक्ष

पारवा ठाणेदारांनी विजय कडे केलाय दुर्लक्ष
महाराष्ट्र24यवतमाळ : योगगुर रामदेवबाबांप्रमाणे आसणे करणे प्रत्येकालाच जमेल असे नाही. त्यासाठी भरपूर मेहनत आणि तपश्चर्यसोबतच लवचिक शरीरही लागते. मात्र हे एक पारधी समाजातील मुलगा सहजतेने करतो. त्याने कठीण आसन करून खुद्द रामदेवबाबांची वाहवा मिळविली आहे.त्याच्या आसनांची सध्या पंचक्रोशीत चर्चा होत आहे.विजय गुलाब राठोड असे या पारधी समाजातील तरुणाचे नाव आहे. २४ वर्षीय विजय हा यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील ५० घरांची वस्ती असलेल्या रघुनगर-घोटीच्या पारधी बेड्यावर राहतो.


पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या रघुनागर-घोटी येथील २४ वर्षीय विजय राठोड ने योगगुरु रामदेव बाबा यांच्या कडून वाहवा मिळवली त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात कौतूक होत आहे. अशात विजय चा संत गाडगे बाबा विध्यापीठने योगा या कलेचे चांगल्या प्रकारे सदरीकरण केल्या बदल कलर कोट देऊन त्याचा सन्मान केलाय. मुद्दा अशा उपस्तिथ होतेय कि, विजय ज्या पारधी समाजातून येतो त्या समाज कडे पाहण्याचा कल आजही गुन्हेगारी समाज म्हणून पहिल्या जातेय. एखादी मोठी चोरीची घटना घडल्यास आजही पोलीस पारधी बेड्यावर जाऊन चौकशी करता. मात्र त्याच समाजातील एक युवक आज योगा मध्ये समाजासह पोलीस स्टेशन च नाव चमकवी त्या परिसराच्या ठाणेदाराने विजय राठोड ची साधी  भेट देऊन कौतूक करू नये हे मात्र कोणालाही न पटणार आहे.


पारधी बेड्यावरील एक तरूण टिव्ही बघत बघत रामदेव बाबा सारखे आसणे करायचा प्रयत्न केल्या नंतर कमालची लवचिकता त्याच्या शरीरात आली.त्यांच्या अंगी असलेली योग कला हि काही प्रतिष्ठानच्या लक्षात आली. विजय साठी लोक वर्गणी करून योग शिबिरात पाठवले.कोणत्याही कठीणात कठीण किंवा सोप्यात सोप्या आसणांची नावे माहित नसताना सुद्धा शास्त्रपद्धतीने योग कला आत्मसात केल.

पारवा ठाणेदारांनी विजय कडे केलाय दुर्लक्ष

विजय ने थेट हरिद्वार गाठल्या नंतर विजय ची योग शिबीरात योग कला योगगुरू रामदेव बाबांच्या नजरेत पडली.बाबा रामदेव यांनी योग कला बघताच त्याला मंचावर पाचारण केले.कठीण योग कला सादर करण्याची संधी रामदेवबाबांनी विजय राठोड ला दिली. छोट्याशा पारधी बेड्यावर चा विजय चक्क रामदेव बाबांच्या मंचावर योग करित असल्याचे बघतात यवतमाळ वाशियांची मान गर्वाने उचावली.पंचक्रोशीत विजय राठोड चा योग कलेचा कौतुक होत आहे. दरम्यान हरिद्वार वरून विजय घरी परतल्या नंतर रघुनगर-घोटी मध्ये जंगी स्वागत करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad