Breaking

Post Top Ad

रविवार, ६ जून, २०२१

'अन् लग्नाचा खर्च शंभर रूपये'

'अन् लग्नाचा खर्च शंभर रूपये'
महाराष्ट्र24आर्णी-यवतमाळ: 'मिया बिबी राजी तो,क्या करेगा काजी' हि म्हण सर्वांनाच माहिती आहे. अशाच काही प्रकार आर्णी तालुक्यातील बोरगांव येथे घडला.


लग्न म्हटलं की, अंगावर कर्ज काढून आजकाल लग्न करण्याची फॅशन बनली आहे. मात्र सर्व नियमाला तिलांजली देत एका झटक्यात दोघांनी नातेवाईक,पोलीस पाटील आणि सरपंचाच्या उपस्थितीत सात जन्म सोबत राहण्याची ग्वाही देत लग्न केलं.

'अन् लग्नाचा खर्च शंभर रूपये'

हि घटना आहे, आर्णी तालुक्यातील बोरगांव येथील. अंतरजातीय विवाह ला आजही समाजात प्रचंड विरोध होतो. याच आठवड्यात आर्णी तालुक्यातील चिकणी(कसबा) येथे मुलीने अंतरजातीय विवाह केल्याच्या रागातून स्वतःच्या वडिलाने मुली सह जवाईला चाकुने मारून हल्ला केल्याची घटना देखील घडली.


लग्नाला केवळ शंभर ते दिडशे रूपये खर्च झाला. त्यामुळे आजच्या बदलत्यायुगात जात-पात विसरून आणि पैसा व वेळ वाचून लग्न करण्याचा संदेश विकास आणि शारदा या नवविवाहित दाम्पत्यांनी दिला आहे.


मात्र बोरगांव येथे रोजमजूरी करणाऱ्या दोन समाजातील मुलगी आणि मुलाने सर्वांच्या अर्थात नातेवाईकांच्या समंतीने विवाह केला. विकास श्रावण नेवारे आणि शारदा कवडू टेकाम ह्या दोघांनी आपल्या नातेवाईकांसह पोलीस पाटील व सरपंच यांच्या प्रमुख उपस्थितीत शंभर रुपयांच्या स्टॅम पेपर वर लिहून आम्ही स्वखुशीने लग्न करित असल्याने जाहिर लिहून दिले.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad