महाराष्ट्र२४ | यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्या अंतर्गत येणाऱ्या दातोडी गावा पासून सहा किमी अंतरावर असलेल्या एका मंदिर परिसरात गुप्तधन शोधणाऱ्या टोळ्यांचा वावर वाढला असल्याची परिसरात चर्चा आहे. यामध्ये काही शासकीय कर्मचारीही गुंतलेले असल्याचा आरोप होत आहे.
दातोडी परिसरात नुकत्याच एक टोळी गुप्तधन काढण्याच्या प्रयत्नात होती असे या परिसरातील नागरिक सांगत आहेत. याची माहिती काही जागरूक नागरिकांना मिळाल्याने घटनास्थळा वरून गुप्तधन काढणारी टोळी पसार होत असताना त्यांना सावळी जवळ काही नागरिकांनी पकडून पारवा पोलीसांच्या स्वाधीन केले असल्याची माहिती आहे.
दरम्यान पोलीसांनी याबाबत गुप्तधन काढणाऱ्या टोळीला विचारणा केली असता त्यांनी आम्ही देवस्थान परिसरातील जागा लेवल करण्यासाठी आलोय. मात्र देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी हात वर केले असले तरी मंदिरावरील महाराजांनी परिसरातील जागा आधीच लेवल केली आहे अशी माहिती दिली आहे.
त्यामुळे जागा लेवल करण्याचा विषय यात कशा आला? विशेष म्हणजे गुप्तधनाच्या शोधात असलेल्या टोळीला जागा लेवल करून देण्याबाबत मंदिर कमेटीने कधी मदत मागितली होती का? यांची सखोल चौकाशी होणे अपेक्षित आहे.