नवे जिल्हाधिकारी होणार अमोल येडगे
यवतमाळ : यवतमाळ येथील जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह यांचे तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल हेडगे यांची यवतमाळ जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोरोना काळामध्ये यवतमाळ जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंह आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये मोठ्याप्रमाणात समन्वय दिसून येत असतांना अचानक जिल्हाधिकारी सिंह यांची बदली होणे हे तमाम जिल्ह्यातील नागरिकांना वेदना देणारी आहे. मध्यंतरीच्या काळात जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी महसूल कर्मचारी तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी संघटनांनी एकत्रित येऊन जिल्हाधिकारी यांच्या विरोधात उपोषणाचे हत्यार देखील उपसले होते. मात्र त्यावेळी पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने हा वाद निवळला होता.
अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ अमोल हेडगे यांची नियुक्ती केली आहे. तर अमरावती जिल्हा परिषदेचे सीईओ यांच्या जागी अविशांत पांडा (भाप्रसे) यांची नियुक्ती केली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा यासंबंधी आदेश जारी करण्यात आले असून अमरावती विभागीय आयुक्त यांच्या सल्ल्याने अन्य अधिका-याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार एम. देवेंदर सिंह (भाप्रसे) यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा असे आदेशात म्हटले आहे. परंतु यवतमाळ जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांची बदली कुठे करण्यात आली. याबाबत गोपनीयता ठेवण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या सारखा अधिकारी जिल्ह्याला पुन्हा मिळणार नाही.सिंह यांनी आत्महत्या ग्रस्त जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना 'मिशन उभारी' या विशेष योजनेतून लाभ मिळवून दिला.जिल्हाधिकारी सिंह यांचे कार्य कायम नागरिकांच्या आठवणीत राहील यात काही शंक्का नाही.