'आगीत पाच घरे जळून खाक'

'आगीत पाच घरे जळून खाक'
घाटंजी-(यवतमाळ) गावातील मध्यवस्तीच्या ठिकाणी अचानक आग लागल्याने गावात एकच तारांबळ उडाली.अचानक लागलेल्या आगीत एक,दोन नव्हे तर तब्बल पाच घरे जळून खाक झाली.


घाटंजी तालुक्यातील पार्डी नस्करी या गावात दि.३१ मार्च ला सकाळी दरम्यान अचानक आग लागली.त्यात पाच घरे जळून खाक झाली.सध्या उन्हाळ्याचा दिवस असल्याने आगीने भयंकर रौद्ररूप धारण केल्याने संपुर्ण गावच जळून खाक होती की, काय असे चित्र पहायला मिळत होते.


दरम्यान गावातील युवकांनी लागलेल्या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले आणि आगीवर नियंत्रण देखील मिळविला.परंतू लागलेल्या आगीत पाच गरिब लोकांच्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून पिडीत नागरिकांना मदत देण्याची आवश्यकता आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने