अमरावती पदवीधर शिक्षक मतदार संघा करिता दि.१ डिसेंबर रोजी मतदान संपन्न झाला.गुरूवारी दि.३ डिसेंबर सकाळ पासून मतमोजणी ला सुरूवात झाली.दरम्यान पहिल्या आणि दुसऱ्या फेरी पासून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक मोठ्या मताने पुढे आहे.
पहिल्या फेरीत भाजचे डाॅ. नितीन धांडे यांना ६६६ तर दुसऱ्या फेरीत १४६१ एकुण २१२७ मतदान मिळाली तर महाविकास आघाडीचे उमेदवार तथा विद्यमान आमदार श्रीकांत देशपांडे यांना पहिल्या फेरीत २३०० आणि दुसऱ्या फेरीत २८२२ एकुण ५१२७ मतदान मिळाली असून अपक्ष उमेदवार किरण सरनाईक यांना पहिल्या फेरीत ३१३१ आणि दुसऱ्या फेरीत २९५७ एकूण ६०८८ मतदान पडल्याने शिक्षक वर्गात सर'नाईक' निघाले अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
किरण सरनाईक हे पहिल्या फेरी पासून आघाडी वर आहेत.त्याअनुशंगाने सरनाईक यांना सर्वच फेरीत आघाडी कायम ठेवल्यास विजयी होण्याची दाट शक्यता आहे.विशेष म्हणजे अपक्ष उमेदवार किरण सरनाईक हे सुरूवाती पासूनच विविध चर्चेत होते.त्यामुळे त्यांना किती फायदा होतो हे पाहणे गरजेचे आहे.