Breaking

Post Top Ad

शनिवार, १२ डिसेंबर, २०२०

बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेच्या विरोधात शिवसेना आक्रमक

बेताल वक्तव्य करणाऱ्या दानवेच्या विरोधात शिवसेना आक्रमक

स्थानिक दत्तचौकात शिवसेनेनेव केले उग्र आंदोलन 

केंद्र सरकारने पारीत केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांचे सुरु असलेला आंदोलन पाकिस्तान तसेच चीनचे षडयंत्र असल्याची टिका केंद्रीय राज्य मंत्री तसेच भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी नुकताच जालना येथे केलं होते. या वक्तव्याच्या विरोधात यवतमाळात शिवसैनिकांचा संताप अनावर झाल्याने त्यांनी रावसाहेब दानवेंचा पुतळा भरचौकात तुडवून उग्र आंदोलन केले. 

रावसाहेब दानवे नशेत टीका करतात 

याआधी सुध्दा रावसाहेब दानवे यांनी  शेतकऱ्यांना साले अशी शिवी दिली होती. आता पुन्हा शेतकऱ्यांच्या  आंदोलनाला गालबोट लावण्याचे काम दानवे करीत आहे. हे सर्व ते मद्य पिऊन करतात काय असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. राजेंद्र गायकवाड,जिल्हा प्रमुख


रावसाहेब दानवेंना मंत्री पदावरुन निष्कासीत करा 

रावसाहेब दानवे हे नेहमीच शेतकरी विरोधी वक्तव्य करीत असतात. मागेही त्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून शिवीगाळ केली होती. आता शेतकरी आंदोलना मागे चीन आणि पाकिस्तान आहे असे बेताल वक्तव्य त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जर शेतकाऱ्यांविषयी संवेदना असतील तर त्यांनी त्वरित रावसाहेब दानवे यांना मंत्रीपदावरून निष्कसित करावे व भाजप मधून बाहेरचा रस्ता दाखवावा. पराग पिंगळे,शिवसेना जिल्हा प्रमुख

देशात गंभीर विषय समोर आला की, भाजप सरकार बुध्दीभेद करतांना दिसून येते. वेगवेगळया विषयांत गुंतवून नागरीकांची दिशाभूल करण्याचे कार्य भाजपाचे सरकार कडून होत आहे.दरम्यान  काळ्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी आंदोलन करीत असतांना त्यांच्या आंदोलनामागे पाकिस्तान आणि चीनचे षडयंत्र असल्याचे वादग्रस्त वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले. असल्यची टिका पराग पिंगळे यांनी केली आहे. या प्रसंगी शिवसेनेच्या सर्वच पदाधिका-यांनी देशभरात वाढत असलेल्या पेट्रोल तसेच डिजल भाववाढीच्या विरोधात संताप व्यक्त केला. यानंतर शिवसैनिकांनी रावसाहेब दानवे यांचा पुतळा भरचौकात तुडवला. त्यानंतर पोलिसांनी पुतळा जप्त केला. या प्रसंगी पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड, संतोष ढवळे, किशोर इंगळे, संजय रंगे, सागरताई पुरी, पिंटू उर्फ नितीन बांगर यांनी उपस्थितांना संबोधित केले. या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे, जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड, यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, माजी आमदार बाळासाहेब मुनगीनवार, उपजिल्हा प्रमुख किशोर इंगळे, तालुका प्रमुख संजय रंगे, शहर प्रमुख नितीन बांगर, बोरी शहर प्रमुख रवी जाधव,महिला जिल्हा समन्वयक सागरताई पुरी उपस्थित होते. 

जीभ कापणा-यास दहा लाख 

रावसाहेब दानवे हे सतत शेतक-यांच्या विरोधात बेताल वक्तव्य करतात. त्यामुळे त्यांची जीभ कापणा-यास दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस तसेच बारा लाखाची गाडी भेट देण्यात येईल अशी घोषणा मी आज केली. मी त्यांची जीभ कापायला निघालो आहे तुम्हीही निघा. शेतक-यांचा अपमान आम्ही सहन करु शकत नाही. संतोष ढवळे,संपर्क प्रमुख  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad