जालना: नव्या कृषी कायदा रद्द करण्याच्या मागणी साठी गेल्या पंधरा दिवसा पासून करोडो शेतकरी दिल्ली सह परिसरात तीव्र आंदोलन करत असताना केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात चीन-पाकिस्तानचा हात असल्याचा वादग्रस्त विधान केलं आहे.
केंद्रीय राज्यमंत्री कायम वादग्रस्त विधाना मुळे चर्चेत असतात.बुधवारी दानवे यांनी थेट शेतकरी आंदोलनावर खळबळजनक दावा करून नव्या वादाला जन्म दिला आहे.'हे आंदोलन बाहेरच्या देशाचं षडयंत्र' असून त्याला चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचा दावा दानवे यांनी केला आहे.त्यामुळे दानवे यांचा वादग्रस्त व्यक्तव्य नव्या वादा फोडणी देणारं असल्याचे संकेत आहे.