जिल्ह्यात पुन्हा एका युवकांने केली आत्महत्या
यवतमाळ : सध्या जिल्ह्यात तरूणांचा आत्महत्याचा सत्र सुरू असून महागांव येथील दोन युवकांची आत्महत्या केल्याची शाई वाळत नाही,तर पुन्हा यवतमाळ तालुक्यातील पिंपरी ईजारा येथील एका युवकांची फसवणूक झाल्याने आत्महत्या केल्याची घटना पुढे आली आहे.
यवतमाळ तालुक्यातील पिंपरी ईजारा या गावातील मृतक चेतन विठ्ठल राठोड वय वर्षे ( २३) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार एका ऑनलाईन क्लब फैक्ट्री नावाच्या कंपनी मध्ये वारंवार २६००० रुपये गुंतवणुक करून सात लाख रुपये रक्कमेचा लकी ड्रॉ मिळणार होते म्हणुन मृतक ने कोणालाही न सांगता गुंतवणूक केली.
मात्र पैसे न मिळाल्यामुळे कंपनी ने पुन्हा मृतक युवकाला संपर्क करने बंद केल्याने आता आपली भरलेल्या रक्कमेची फसवणूक केल्याचे लक्षात आल्याने तणावाखाली येऊन मृतकने दि.१९ नोव्हेंबर रोज गुरुवारी घरून कुणालाही न सांगता निघून गेला. कुटुंबीयांना घरी मृतक चेतन आढळून न आल्याने कुटुंबियांनी व गावकर्यांनी दिवसभर गावातील शिवारात तपास घेतल्यावर गावाजवळील जंगलातील अंगात असलेल्या स्वेटर च्या लेसनी झाडाला गळफास लावून लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
नेमके आत्महत्येचे कारण स्पष्ट करण्यासाठी यवतमाळ पोलीस पुढील तपास करीत आहेत. मृतक हा आय. टी. आय. यवतमाळ येथील विद्यार्थी असून तो वयाच्या पाचव्या वर्षी पासून त्याच्या काका कडे पिंपरी येथे राहत होता. त्याचा स्वभाव सर्वांशी मनमिळावू असल्याने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. स्थानिक प्रशासनाला संबंधित कंपनी वर कारवाई करून कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे.
