'मिशन उभारी' अंतर्गत वीस आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मिळणार मदत

'मिशन उभारी' अंतर्गत वीस आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मिळणार मदत
यवतमाळ: जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्या सकारात्मक संकल्पनेतून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त आणि ताणावग्रस्त कुटुंबीयांना धीर देण्याच्या दृष्टीकोनातून 'मिशन उभारी' अंतर्गत कार्यक्रम राबविण्यात येत आहे.त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आत्महत्या केलेल्या पात्र-अपात्र शेतकऱ्यांच्या वीस  कुटुंबीयांना विविध योजनेंतर्गत लाभ देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा शेतकरी वर्गातून कौतुक 

'मिशन उभारी' अंतर्गत वीस आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांना मिळणार मदत
यवतमाळ हा शेतकरी  आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणुन देशात ओळखल्या जातो. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आणि ताणावग्रस्त शेतकऱ्यांना ताणाव मुक्त करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांनी जिल्ह्यात 'मिशन उभारी' हा उपक्रम शेतकऱ्यांसाठी हाती घेतला आहे. शेतकऱ्यांना धीर देणारा उपक्रम जिल्हाधिकारी राबवत असल्याने या उपक्रमाचे आणि जिल्हाधिकारी यांचे शेतकरी वर्गातून कौतुक केल्या जात आहे.

जिल्ह्यात आत्महत्या केलेले गजानन माणिकराव नखाते रा.कवठा ता.आर्णी, शाम ज्ञानेश्वर जिभकाटे रा.कुऱ्हा ता.आर्णी, संतोष कैलास खटके रा.ढाणकी ता.उमरखेड, परशराम नथ्थू लेडांगे रा.पठारपुर ता.वणी, शंकर गुलाब काकडे रा.बाबापुर ता.वणी,विकास रामकृष्ण चौधरी रा.मार्डी ता.मारेगांव, भानुदास शंकर बडे रा.नरसाळा ता.मारेगांव, कौशल्याबाई सांबशीव मोट्टेवार रा.पहापळ ता.केळापुर, बाळु शाबुद्दीन घोसले रा.पारधीबेडा घोटी ता.घाटंजी, गजानन विठ्ठल चव्हाण रा.हातोला ता.दारव्हा, गजानन शंकर लोंढे रा.किन्ही(ग) ता.दारव्हा, शिवाजी उर्फ बालाजी सुभाष गायकवाड रा.धरमवाडी ता.पुसद, गोपाल रामराव सवळे रा.सावंगा ता.दिग्रस, अजय नथ्थू वड्डे रा.शिंगणापूर ता.कळंब, रमेश शेषराव राठोड रा.जनुमा ता.उमरखेड, मुरलीधर बाजीराव जाधव रा.खेड ता.दारव्हा आणि रूपेश गजानन सिंहे रा.लोही ता.दारव्हा या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.यामध्ये पात्र १० तर अपात्र १० आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या समावेश आहे.


जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या केल्या नंतर ती आत्महत्या पात्र ठरत असेल तर त्याला लाभ दिल्या जाते.मात्र जिल्हाधिकारी सिंह यांच्या संकल्पनेतून हाती घेतलेल्या 'मिशन उभारी' या उपक्रमातून पात्र आणि अपात्र वीस शेतकऱ्यांच्या कुटूंबीयांना नरेगा अंतर्गत विहिर, संजय गांधी योजनेचा लाभ, पंतप्रधान किसान योजनेंचा लाभ, शेळी पालन योजनेंचा लाभ, आत्महत्याग्रस्ताच्या मुलाला केंद्रिय शाळेत प्रवेश, मोटार पंप, जनावर वाटप आदी शासनाच्या योजनेतून लाभ देण्याचा प्रयत्न जिल्हाधिकारी एम.डी.सिंह तथा जिल्हा प्रशासना कडून केल्या जात आहे.

Thanks For Your Valuable Response

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने