यवतमाळ : जिल्ह्यात शुक्रवारी पुन्हा ५२ जण नव्याने पॉझिटीव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला.
मृतकामध्ये घाटंजी शहरातील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या २८ जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
