Breaking

Post Top Ad

मंगळवार, २७ ऑक्टोबर, २०२०

मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश:जिल्हाधिकारी सिंह

 

मृत्यूदर कमी करण्यात प्रशासनाला यश:जिल्हाधिकारी सिंह

यवतमाळ : कोरोना विषाणू संसर्ग तसेच विविध यंत्रणेमार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनेसंदर्भात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी जिल्हास्तरीय टास्क फोर्सची बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महिंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाचे डॉ. पी.एस.चव्हाण, डॉ. गिरीश जतकर, डॉ. विजय डोंबाळे आदी उपस्थित होते.

किती रुग्णांची नमुने तपासणी झाली व किती जणांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह आले, ही सर्व आकडेवारी अपडेट ठेवा. तालुकानिहाय किती ॲन्टीजन टेस्ट किट उपयोगात आणल्या, किती शिल्लक आहेत. ॲन्टीजनद्वारे किती जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह  आले आहेत. जिल्ह्यात कोरोनासंदर्भात वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, सारी, आयएलआय रुग्णांची तपासणी आदींचा त्यांनी आढावा घेतला.

दरम्यान यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत अचानक वाढ झाली होती. मात्र सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल व केलेल्या उपाययोजनेमुळे मृत्युदर कमी करण्यात प्रशासनाला यश आले आहे. ही दिलासादायक बाब असली तरी जिल्ह्यात एकही मृत्यु होऊ न देणे, यालाच प्रशासनाचे प्राधान्य आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या जुन्या कोव्हीड रुग्णालयातील रुग्ण सुपर स्पेशालिटीमध्ये स्थलांतरीत करण्याचे महाविद्यालयाच्या प्रशासनाने नियोजन करावे. ‘माझे कुटुंब,-माझी जबाबदारी’ अंतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये किती रुग्ण आरोग्य यंत्रणेकडे रेफर करण्यात आले. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thanks For Your Valuable Response

Post Top Ad